जंजिऱ्या च्या सिद्दी चे हाल .....
1669 च्या एप्रिल मध्ये महाराजांचे सैन्य सिद्दी च्या प्रदेशात रवाना झाले आणि सैन्याने अत्यंत रोषाने सिद्दी च्या प्रदेशात धडक मारली सिद्दी फतहखान मुक्काम दंडा राजपुरी जवळ होता तो घाबरून मुरुड जंजिऱ्यात जाऊन बसला आणि सिद्दी चे लोक इंग्रजांना आश्रय मागू लागले पण इंग्रजांनी आश्रय देण्यास नाकारले 9 जून 1669 च्या इंग्रज गोव्हर्नर ने सिद्दी च्या लोकांना एक पत्र लिहले त्यामध्ये तो लिहतो ' आम्हाला स्वतःचे सुरक्षा करण्यासारखे खुप आहे आणि शिवाजीशी वैर करण्याची आमची तयारी नाही'.
दंडा राजपुरी महाराजांनी जिंकून घेतली जंजिरा जमिनिकडून घेरला गेला अधून मधून समुद्रा मध्ये मराठ्यांची तारवे घिरट्या घालत होते. फहतहखानाची पण लांब पल्ल्याचा आणि प्रचंड दारू गोळा या जोरावर किल्ला अजिंक्य होता महाराजांनी त्याची कोंडी करून किल्ला घेण्याचा निर्णय घेतला आणि महाराजनचे हे अस्त्र कामी आले आणि सिद्दी उपासमारीची संकटाने टेकिस आला त्याने मोघालांच्या कडे धाव घेतली मोगलांनी महाराजांना वेढा काढून घेण्याची हुकूम दिला पण तो महाराजांनी धुडकावून लावला आता त्या सिद्दीनि कल्याण च्या लोदीखान ला किल्ला सुपूर्त करून निघून जाण्याचे ठरवले पण महाराजांनी लोदी खान ला पण दूर राखले आता सिद्दी ची पुरती कोंडी झाली तो किल्ल्याला तब्बल 6 महिने वेढा पडला होता अखेर सरंक्षणाचे आश्वासन मिळाल्यास जंजिरा महाराजांच्या हाती द्याचे ठरवले मुरुड जंजिरा स्वराज्यात दाखल होण्याची शुभ चिन्ह दिसू लागली.अचानक सिद्दी फहतहखाना जवळच्या सिद्दी संबूल ,सिद्दी याकृत ,सिद्दी खैरीयत यांनी सिद्दी फहतहखान ला कैद केले आणि सिद्दी संबूल हा जंजिऱ्याचा प्रमुख झाला आणि त्याने औरंजेबशी संबंध साधला त्यामुळे पुन्हा मोघल आणि मराठे संघर्ष चालू झाला हे मोघल रुपी मोठे संकट दूर करण्यासाठी महाराजांना माघार घेणे भाग पडले पण त्या सिद्दीची जी कोंडमारी झाली होती त्यामुळे तो चांगला दचकून होता त्यामुळे महाराजांच्या प्रदेशात धुमाकळू घालायचा कमी झाला
Monday, 7 November 2016
जंजिऱ्या च्या सिद्दी चे हाल .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment