THE FATHER OF INDIAN NAVY
"छत्रपती शिवाजी महाराज"
महाराजांना ज्यांच्याशी सतत संघर्ष करून स्वराज्याची स्थापना करावी लागली त्या दक्षिणेतील व उत्तरेतील सर्वच शत्रू व त्यांची राज्ये हे आपल्या स्वराज्यापेक्षा आकाराने मोठी होती औरंगजेबाचे मोघली साम्राज्य तर आशिया खंडातील सर्वात मोठे व बलिष्ठ साम्राज्य पण यापैकी कोणालाही स्वतःचे नौदल निर्माण करता आलेले नाही किंबहुना तशी कल्पना कोणाच्या मनाला चाटून गेली नाही .जगाचा महत्वाचा भाग समुद्र यावर फक्त डच, इंग्रज पोर्तुगीज या लोकांचे राज्य होते ते आपल्या नाविक सामर्थ्यावर समुद्रावर सत्ता गाजवत होते.छत्रपती शिवाजी महाराज जरी भूमीवर मोघल व दक्षिणेतील सुलतान यांच्याशी सतत युद्धात राहावे लागले तरीही स्वराज्य प्रयत्नांच्या प्रारंभी च्या काळात तत्कालीन नौका निर्मितीचे महत्वाचे केंद्र कल्याण जिंकताच महाराजांचे समुद्रावर लक्ष वेधले .आणि अफझलखानावर विजय मिळवून कल्याण भिवंडी व पनवेल येथे युद्ध नौका बांधल्या या युद्ध नौका बंदरातून बाहेर जाऊ नयेत या साठी पोर्तुगीज प्रयत्न करत होते पण महाराजांच्या प्रभावसमोर त्यांना नमते घ्यावे लागले. केवळ युद्धनौका उभारल्या असे नव्हे तर व्यापारी नौका उभारून समुद्रव्यापाराला प्रारंभ हि केला या नौका इराण, बसरा ,मक्का या ठिकाणी व्यापाराला जात .या बरोबर महाराजांनी महत्वाच्या ठिकाणी जलदुर्ग हि बांधले आणि एक एक जलदुर्ग स्वराज्यात आणला. एकीकडे पदमदुर्ग बांधून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी वसवली तर आणि सिंधुदुर्ग बांधून टोपीकरांच्या उरावर दुसरी शिवलंका निर्माण केली.
1657 पासून 1750 पर्यंत शिवरायांचे आरमार हे युरोपीय,इंग्रज, डच या राष्ट्रासाठी एक भयस्थान होते आणि आजही इतर देशासाठी आहे.
मराठ्यांच्या आरमाराचा स्वराज्याला झालेला फायदा थोडक्यात आढावा.
१) त्यांनी कोकण किनाऱ्यावरील जल व्यापऱ्यांच्या मालाचे युरोपीय मोघल आणि सिद्दी यांच्या पासून संरक्षण केले
२) स्वतःची ची व्यापारी जहाज व प्रजाजनाच्या व्यापाराला पूरक असे संरक्षण दिले
३)परिकीयांच्या लेखि अनुज्ञा न घेता समुद्रावर संचार करण्याचे स्वतंत्र प्रस्तापित केले
४)काळाच्या आवश्यकते नुसार इंग्रज ,अरब ,डच यांच्याशी संधी साधण्याचा देखावा करून पोर्तुगीजांना जेरील आणले
5)१६७० पर्यंत महाराजांनी त्यांचे नाविक सामर्थ्य एवढे वाढवले होते कि मुंबई च्या खाडीत 160 युद्ध नोका उभ्या करून समुद्रावर संचार करत होत्या यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या मनात चांगलाच धाक उत्पन्न केला होता
६)खांदेरीवर विजय मिळवून इंग्रज व सिद्दी याच्या संयुक्त नौदलाचा पराभव करून स्वराज्याचे नौदलाचे सामर्थ्य सर्वांच्या प्रत्येयाला आणून दिले .
7) सुरत व इतर ठिकाणी जाणाऱ्या भुदलाचे सरंक्षण व साह्य आरमाराने केले आहे.
८)जे नाविक कामगार सिद्दी आणि इंग्रज डच यांच्या समवेत काम करत होती (आपल्या भूमीतील) ती महाराजनच्या कडे आकर्षित होऊन महाराजांच्या साठी नौका बांधणीचे कामात लागली त्यामुळे त्या लोकांना रोजगार उपलब्धी झाली
९) सिद्दी ची लोक किनाऱ्या लगतच्या भागा मध्ये जी धुमाकूळ घालत होती ती बंद झाली.
१०) युरोपीय लोकांची जहाज बंदरात आल्यानंतर महाराजांचे अधिकारी कढून कडक तपासणी करून त्यांना प्रवासाची अनुज्ञा(permission) देत. त्यामुळे युरोपीय लोकांच्या व्यापारावर नियंत्रण होते.

ऋषिकेश चिंचकर
No comments:
Post a Comment