Friday, 18 November 2016

1971 युद्ध आणि INS विक्रांत


1971 च्या युद्धामध्ये पाकिस्तान ला माहिती असेल कि या युद्ध चे डाव कोण बदलू शकत असेल तर ते आहे  INS VIKRANT.
INS विक्रांत ला डुबवण्यासाठी पाकिस्तान ने त्यांची सर्वात मोठे शस्त्र म्हणजे सबमरीन गाजी . PNS गाजी हि अमेरिकन बनावटी ची युद्धपाणबुडी होती 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या अगोदर काही दिवसापूर्वी  डायब्लो हि अमिरीकने बनावटी ची पाणबुडी अमेरिका ने पाकिस्तान ला दिली होती त्याचे नाव पाकिस्तान ने गाजी असे ठेवले होते..त्या वेळी  भारत नौदलात एक हि पाणबुडी नव्हती. अशा वेळेस त्या गाजी पाणबुडी ला  मात द्यायचे म्हणजे एक अवघड बाब होती .जर गाजी हे त्याच्या इराद्या मध्ये सफल झाले असते तर कदाचित भारतयुद्धाच्या  सुरवातीलाच  दबाव मध्ये आला असता पण असे झाले नाही.
गाजी हे पाण्याखालून प्रवास करून अरब समद्रातून बंगाल च्या खाडीत पर्यंत पोहचली होती .पाकिस्तान चे नौदल अधिकारी जनरल नियाजी आणि त्यांचेनौदलाचे सैन्य याना ऐक मनधर्य मिळावे म्हणून ते नेहमी म्हणत कि हि पाणबुडी  पूर्ण भारताला चक्कर मारून ढाका पर्यंत पोहचू शकते कारण हि 75 दिवस सलग पाण्यामध्ये राहण्याची क्षमता असलेली पाणबुडी होती
20 हजार किलोमीटर प्रवास करण्याची  क्षमताअसलेले गाजी पाणबुडी 14 ते 22 नोव्हेबर च्या दरम्यान गुपचुप कराची पासून बंगालच्या खाडी पर्यंत पाठवण्यात आले त्यांचे मिशन होते कि विमानवाहक क्षमता असलेले INS विक्रांत ला समद्रात जलसमाधी देण्याचे.पण सर्व डाव फसले. सिग्नल इंटरसेप्ट च्या द्वारे लगेच कळले कि गाजी हि पणबुडी कराची आणि  बंगाल च्या खाडी च्या मध्ये कुठे तरी प्रवास करत आहे.
पण हे विशाखापट्टणम मधून निगालेल्या INS विक्रांत साठी एक धोक्याचा इशारा होता. याच परिस्तिथी चा फायदा घेऊन नौदलाचे अधिकारी एन कृष्णन यांनी  एक डाव खेळला त्यामध्ये त्यांनी INS विक्रांत च्या ऐवजी INS राजपूत ला INS विक्रांत होण्याचे नाटक म्हणजे विक्रांत च्या नावाने समद्रातून पाठवण्यात आले.आणि या INS राजपूत द्वारे  वायरल संदेश पाठवण्यात आले .मद्रास च्या nevy camp लाहि संदेश पाठवण्यात आला कि कधी हि युद्धजन्य परिस्तिथी तयार होऊ शकते असा  धोक्याचा संदेश देण्यात आला. पण भारतातील पाकिस्तानी गुप्तचर संघटना द्वारेINS विक्रांत हे विशाखापट्टणम मध्ये आहे हि खबर लवकरच लागणार होती आणि झाले हि तसेच
त्यांना हि खबर लागली कि INS विक्रांत हि विशाखापट्टणम मध्ये आहे त्यांनी विक्रांत ला डुबवण्यासाठी गाजी ने रस्ता बदलून विशाखापट्टणम कडे प्रवास करायला चालू केले .भारतीय नौसेनेला गाजी  मद्रास मध्ये पोहचण्याची दमक लागताच INS विक्रांत ला वाचवण्याची तयारी चालू झाली. एक परिस्तिथी अशी पण होती कि विक्रांत च्या बॉयलर मध्ये थोडी खराबी आलेली होती मग अश्या परिस्थती मध्य 16 नॉटे एवढ्या कमी वेग मध्ये हि कधीही पाणबुडी ची शिकार होऊ शकली असती. गाजी पासून विक्रांत ला दूर ठेवण्यासाठी विक्रांत ला  "x ray" म्हणून एका गुप्त ठिकाणी हलवण्यात आले हे ठिकाण मद्रास पासून लांब 1000km अंदमान निकोबार मध्ये होते. INS विक्रांत हि विशाखापट्टणम जवळ आहे हि खबर ऐकून गाजी तिथपर्यंत जवळपास पोहचली होती.याच परिस्थिती चा फायदा घेऊन  विशाखापट्टणम पासून काही अंतरावरती असणाऱ्या INS राजपूत चे नौदल अधिकारी  लेफ्टनंट कमांडर इंदर सिग यांना पाण्यामध्ये काही हालचाली दिसल्या  त्यांनी अंदाज लावला कि पाणबुडी हि पाण्यात असताण अश्या हालचाली होतात . लेफ्टनंट कमांडर इंदर सिग  यांनी आपल्या नौदलाच्या सैनिकांना  पाणबुडी नष्ट करण्यासाठी तयार केलेले दोन डेफ्थ चार्जर चा मारा करण्यास सांगितला .पाण्याच्या आत पोहचताच  डेफ्थ चार्जर ने आपले काम केले आणि जी INS विक्रांत ला जलसमाधी देण्यासाठी आलेली PNS गाजी ला पाण्यामध्येच जलसमाधी मिळाली.  पाकिस्तान हे नेहमी च कांगावा करणारे आहेत त्यामुळे ते सांगतात कि गाजी हि स्वता डुबली होती.
गाजी जलसमाधी हि भारतीय नौदलाच्या इतिहासात एक सुवर्णपण आहे
भारतीय आरमाराची मूर्तमेढ रोवनारे छत्रपती शिवाजी महाराज  आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श ,युद्धनित्या याच्या जोरावर भारताचे नौदल हे जगाच्या  अनेक देशाच्या नौदलात 5 व्या क्रमांकाचे नौदल आहे महाराजांनपासून सुरु झालेला या देशसेवेची प्रथा हि पुढे असाच आदर्श घेत राहणार.हे नक्कीच..
राष्ट्रप्रथम
-ऋषिकेश चिंचकर

Inadian navy vice admiral एन कृष्णन 


अमिरीकन बनावटीची PNS गाजी (पाकिस्तान)

INS विक्रांत

INS राजपूत

No comments:

Post a Comment