१९६० च्या दशकात भारतातील सामरिक, राजकीय आणि आर्थिक घटनांमुळे अनेक स्थित्यंतरे झाली. चीनचे १९६२ चे आक्रमण व त्यानंतर १९६५ च्या पाकिस्तान युद्धामुळे भारताच्या सुरक्षिततेला असलेला धोका अधोरेखित झाला. त्यातच या दशकात देशाच्या दोन पंतप्रधानांचे अचानक निधन झाले. त्यातून राजकीय अस्थैर्य निर्माण होऊन त्याला पक्षांतर्गत संघर्षांचे स्वरूप प्राप्त झाले. १९६५ व १९६६ च्या सलगच्या दुष्काळामुळे शेती आणि अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. पूर्वोत्तर राज्यांतील नागा आणि मिझो बंडखोरी तसेच नुकत्याच सुरू झालेल्या नक्षल चळवळीमुळे अंतर्गत सुरक्षेला आणि देशाच्या सार्वभौमतेला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. या पाश्र्वभूमीवर इंदिरा गांधी यांनी १९६६ च्या जानेवारी महिन्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.
सामाजिक भान, राजकीय परिस्थितीची अचूक जाण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा सखोल अभ्यास असणाऱ्या या जनसंमोही नेतृत्वाने सर्वच आघाडय़ांवर अत्यंत कठोर व धाडसी निर्णय घेऊन भारताला एक सक्षम राष्ट्र व एक उदयोन्मुख महाशक्ती बनविण्याचा पाया घातला.
इंदिराजी सत्ता हाती घेत असतानाच दुष्काळाच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले होते. सलग दोन वर्षे पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे देशांतर्गत अन्नधान्यांचे उत्पादन घटले असल्याने ते आयात करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच अमेरिकेकडून (पीएल- ४८० कायद्याखाली) गहू आयात करताना अप्रत्यक्षपणे अनेक जाचक अटी लादल्या गेल्या. अशा परिस्थितीतही अन्नधान्याची खरेदी आणि वितरण व्यवस्था अत्यंत परिणामकारकरीत्या राबवून दुष्काळाचे सावट दूर करण्यात सरकारला यश आले. या कटु अनुभवातूनच धडा घेऊन इंदिरा गांधींनी पुढे हरितक्रांती घडवून आणली व भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले.
लागोपाठच्या चीन आणि पाकिस्तान युद्धामुळे देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली होती. परिणामी युद्धातील खर्चामुळे सामाजिक क्षेत्रावरील खर्चात काटछाट करावी लागली. आर्थिक अस्थैर्य, उद्योग क्षेत्रातील शिथिलता आणि वित्तीय संसाधनांचा तुटवडा यामुळे पंचवार्षिक योजना ठप्प करावी लागली. योजना अवकाश (Plan Holiday) जाहीर करण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेस उभारी देण्यासाठी इंदिराजींना १९६६ मध्ये रुपयाच्या अवमूल्यनाचा अप्रिय, परंतु कठोर निर्णय घेतला. तसेच त्यानंतर १९६९ मध्ये आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP कायदा करावा लागला. सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासासाठी ‘गरिबी हटाओ’ची घोषणा देत त्यांनी १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णयही घेतला.
आंतरराष्ट्रीय व्यवहारात इंदिराजींनी नेहरूंचा वारसा पुढे नेत इजिप्तचे नासेर, युगोस्लावियाचे टिटो आणि क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांच्यासोबत संबंध दृढ करून अलिप्त राष्ट्र चळवळीला बळकट केले. त्यांनी अमेरिकेच्या व्हिएतनामवरील हल्ल्यांचा निषेध केला आणि अमेरिकेची नाराजी पत्करली. तत्कालीन सोविएत संघाबरोबर संबंध अधिक घनिष्ठ केले.
त्यांच्या कार्यकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचीदेखील विशेष प्रगती झाली. त्यांनी १९६९ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) स्थापना केली. अंतराळ विज्ञानाचे भविष्यातील सामरिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी या क्षेत्रातील संशोधनाला विशेष चालना दिली. त्याची परिणती म्हणजे १९७५ मध्ये भारताने ‘आर्यभट्ट’ हा पहिला कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला. पुढे त्यांच्या कारकीर्दीतच पहिल्या भारतीय अंतराळवीराला अवकाशात जाण्याची संधी मिळाली.
भारताच्या संरक्षण सज्जतेसाठी पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेले कार्य अतुलनीयच आहे. १९७१ च्या बांगलादेश युद्धात कणखर नेतृत्व, अचूक व्यूहतंत्र व रणनीतीच्या जोरावर पाकिस्तानवर भारताने विजय मिळविला. पाकिस्तानची फाळणी आणि बांगलादेशची निर्मिती ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात उल्लेखनीय घटना होती. या पाश्र्वभूमीवर त्यांनी १९७४ ला अणुबॉम्बचा स्फोट करण्याचे धाडस दाखविले. या घटनेमुळे भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाची जगात गंभीरपणे दखल घेतली गेली. परंतु त्याच वेळेस एका शांतताप्रिय आणि लोकशाही देशाने अण्वस्त्राचा पहिला वापर न करण्याचा (no first use) सिद्धान्त जाहीर करून भारत एक जबाबदार राष्ट्र असल्याचे त्यांनी घोषित केले.
इंदिरा गांधी या पर्यावरणाबद्दल जागरूक व संवेदनशील असणाऱ्या पंतप्रधान होत्या. पर्यावरणाचे संरक्षण आणि वन्यप्राण्यांचे जतन ही काळाची गरज त्यांनी ओळखली. त्यांनी शाश्वत विकासाकरिता वनांचे महत्त्व जाणून १९८० साली वन संरक्षण कायदा पारित केला. ‘व्याघ्र प्रकल्प’ (Project Tiger) सारखी पथदर्शी योजना सुरू केली. संयुक्त राष्ट्रांच्या १९७२ मधील स्टॉकहोम परिषदेत बोलताना गरिबी आणि प्रदूषण यांमधील परस्परसंबंध त्यांनी जगासमोर विशद करून ‘दारिद्रय़ निर्मूलन’ या विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या सर्वात गंभीर समस्येकडे जगाचे लक्ष वेधले.
राष्ट्रीय आणीबाणी ही इंदिराजींच्या कालखंडातील सगळ्यात जास्त चर्चिली जाणारी घटना आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींना निवडणूक प्रक्रियेत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्यांची निवड रद्दबातल ठरविली. याविरुद्ध इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलाची वाट न पाहता जयप्रकाश नारायण यांनी त्यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली. जेव्हा जे. पीं.नी सैन्य आणि पोलीस दलाला बंडाची चिथावणी दिली तेव्हा देशात अंतर्गत बंडाळी आणि सुरक्षेस होणारा संभाव्य धोका डोळ्यासमोर ठेवून इंदिराजींनी २६ जून १९७५ रोजी देशभर आणीबाणी लागू केली. २१ महिने राबविण्यात आलेल्या या आणीबाणीचे देशभरात विविध पडसाद उमटले. परंतु जनमत विरोधात आहे हे माहीत असतानादेखील इंदिराजींनी १९७७ मध्ये सार्वत्रिक निवडणुका पुकारल्या. निवडणुकीत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
इंदिराजींना दिल्या गेलेल्या ‘गुंगी गुडिया’ अथवा ‘दुर्गामाता’ या दोन्ही संबोधनांपेक्षा इतिहास त्यांना एक आत्मविश्वासू, कणखर नेतृत्वगुण असलेले विवेकनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून आणि कशाचीही तमा न बाळगता देशाच्या अखंडतेसाठी आपल्या प्राणांची त्यांनी दिलेली आहुतीच देश अधिक लक्षात ठेवेल
Friday, 18 November 2016
IRON LADY OF INDIA
1971 युद्ध आणि INS विक्रांत
1971 च्या युद्धामध्ये पाकिस्तान ला माहिती असेल कि या युद्ध चे डाव कोण बदलू शकत असेल तर ते आहे INS VIKRANT.
INS विक्रांत ला डुबवण्यासाठी पाकिस्तान ने त्यांची सर्वात मोठे शस्त्र म्हणजे सबमरीन गाजी . PNS गाजी हि अमेरिकन बनावटी ची युद्धपाणबुडी होती 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या अगोदर काही दिवसापूर्वी डायब्लो हि अमिरीकने बनावटी ची पाणबुडी अमेरिका ने पाकिस्तान ला दिली होती त्याचे नाव पाकिस्तान ने गाजी असे ठेवले होते..त्या वेळी भारत नौदलात एक हि पाणबुडी नव्हती. अशा वेळेस त्या गाजी पाणबुडी ला मात द्यायचे म्हणजे एक अवघड बाब होती .जर गाजी हे त्याच्या इराद्या मध्ये सफल झाले असते तर कदाचित भारतयुद्धाच्या सुरवातीलाच दबाव मध्ये आला असता पण असे झाले नाही.
गाजी हे पाण्याखालून प्रवास करून अरब समद्रातून बंगाल च्या खाडीत पर्यंत पोहचली होती .पाकिस्तान चे नौदल अधिकारी जनरल नियाजी आणि त्यांचेनौदलाचे सैन्य याना ऐक मनधर्य मिळावे म्हणून ते नेहमी म्हणत कि हि पाणबुडी पूर्ण भारताला चक्कर मारून ढाका पर्यंत पोहचू शकते कारण हि 75 दिवस सलग पाण्यामध्ये राहण्याची क्षमता असलेली पाणबुडी होती
20 हजार किलोमीटर प्रवास करण्याची क्षमताअसलेले गाजी पाणबुडी 14 ते 22 नोव्हेबर च्या दरम्यान गुपचुप कराची पासून बंगालच्या खाडी पर्यंत पाठवण्यात आले त्यांचे मिशन होते कि विमानवाहक क्षमता असलेले INS विक्रांत ला समद्रात जलसमाधी देण्याचे.पण सर्व डाव फसले. सिग्नल इंटरसेप्ट च्या द्वारे लगेच कळले कि गाजी हि पणबुडी कराची आणि बंगाल च्या खाडी च्या मध्ये कुठे तरी प्रवास करत आहे.
पण हे विशाखापट्टणम मधून निगालेल्या INS विक्रांत साठी एक धोक्याचा इशारा होता. याच परिस्तिथी चा फायदा घेऊन नौदलाचे अधिकारी एन कृष्णन यांनी एक डाव खेळला त्यामध्ये त्यांनी INS विक्रांत च्या ऐवजी INS राजपूत ला INS विक्रांत होण्याचे नाटक म्हणजे विक्रांत च्या नावाने समद्रातून पाठवण्यात आले.आणि या INS राजपूत द्वारे वायरल संदेश पाठवण्यात आले .मद्रास च्या nevy camp लाहि संदेश पाठवण्यात आला कि कधी हि युद्धजन्य परिस्तिथी तयार होऊ शकते असा धोक्याचा संदेश देण्यात आला. पण भारतातील पाकिस्तानी गुप्तचर संघटना द्वारेINS विक्रांत हे विशाखापट्टणम मध्ये आहे हि खबर लवकरच लागणार होती आणि झाले हि तसेच
त्यांना हि खबर लागली कि INS विक्रांत हि विशाखापट्टणम मध्ये आहे त्यांनी विक्रांत ला डुबवण्यासाठी गाजी ने रस्ता बदलून विशाखापट्टणम कडे प्रवास करायला चालू केले .भारतीय नौसेनेला गाजी मद्रास मध्ये पोहचण्याची दमक लागताच INS विक्रांत ला वाचवण्याची तयारी चालू झाली. एक परिस्तिथी अशी पण होती कि विक्रांत च्या बॉयलर मध्ये थोडी खराबी आलेली होती मग अश्या परिस्थती मध्य 16 नॉटे एवढ्या कमी वेग मध्ये हि कधीही पाणबुडी ची शिकार होऊ शकली असती. गाजी पासून विक्रांत ला दूर ठेवण्यासाठी विक्रांत ला "x ray" म्हणून एका गुप्त ठिकाणी हलवण्यात आले हे ठिकाण मद्रास पासून लांब 1000km अंदमान निकोबार मध्ये होते. INS विक्रांत हि विशाखापट्टणम जवळ आहे हि खबर ऐकून गाजी तिथपर्यंत जवळपास पोहचली होती.याच परिस्थिती चा फायदा घेऊन विशाखापट्टणम पासून काही अंतरावरती असणाऱ्या INS राजपूत चे नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर इंदर सिग यांना पाण्यामध्ये काही हालचाली दिसल्या त्यांनी अंदाज लावला कि पाणबुडी हि पाण्यात असताण अश्या हालचाली होतात . लेफ्टनंट कमांडर इंदर सिग यांनी आपल्या नौदलाच्या सैनिकांना पाणबुडी नष्ट करण्यासाठी तयार केलेले दोन डेफ्थ चार्जर चा मारा करण्यास सांगितला .पाण्याच्या आत पोहचताच डेफ्थ चार्जर ने आपले काम केले आणि जी INS विक्रांत ला जलसमाधी देण्यासाठी आलेली PNS गाजी ला पाण्यामध्येच जलसमाधी मिळाली. पाकिस्तान हे नेहमी च कांगावा करणारे आहेत त्यामुळे ते सांगतात कि गाजी हि स्वता डुबली होती.
गाजी जलसमाधी हि भारतीय नौदलाच्या इतिहासात एक सुवर्णपण आहे
भारतीय आरमाराची मूर्तमेढ रोवनारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी घालून दिलेले आदर्श ,युद्धनित्या याच्या जोरावर भारताचे नौदल हे जगाच्या अनेक देशाच्या नौदलात 5 व्या क्रमांकाचे नौदल आहे महाराजांनपासून सुरु झालेला या देशसेवेची प्रथा हि पुढे असाच आदर्श घेत राहणार.हे नक्कीच..
राष्ट्रप्रथम
Wednesday, 9 November 2016
अफझलखान वध
भारताच्या इतिहासात पायदळाच्या स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स या युद्धनित्याचा पुरेपूर उपयोग कुठं झाला असेल तर अफझलखानवध
"Strategy is the art of beginning the enemy to battle"
शत्रूला प्रत्येक्ष युद्धसाठी रणक्षेत्रावर खेचून आणण्यासाठी जी कला केली जाते ती स्ट्रॅटेजी .वाईमध्ये असणाऱ्या अफझल खानाला प्रतापगडच्या पायथ्याला भेटीसाठी आणले हि होती स्ट्रॅटेजी
" tactics are the method by which a commander endevours to overreach the enemy when battle is joined"
आणि प्रत्येक्ष युध्द झाल्यावर किंवा युद्धाच्या वेळी शत्रूवर मात करण्यासाठी जो डाव टाकला जातो त्याला टॅक्टिक्स म्हणतात. अफझलखानच्या वधानंतर महाराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराने कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकले अन्नोजी दत्तोनि रत्नागिरी पर्यंत चा प्रदेश घेतला तर इकडे स्वतः महाराज सातारा ,कराड , प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजी पालकरांनी त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली हि होती टॅक्टिक्स .
ऋषिकेश चिंचकर
Monday, 7 November 2016
भुलेश्वर
Bhuleshwar temple Pandavas during which almost 800 year old temple was built. The temple is in a dense forest called the Bhuleshwar.
The temple of Lord Shiva is worshiped and his five sexes. Statue of Lord Vishnu and Goddess Lakshmi is also engaged in the temple.
जंजिऱ्या च्या सिद्दी चे हाल .
जंजिऱ्या च्या सिद्दी चे हाल .....
1669 च्या एप्रिल मध्ये महाराजांचे सैन्य सिद्दी च्या प्रदेशात रवाना झाले आणि सैन्याने अत्यंत रोषाने सिद्दी च्या प्रदेशात धडक मारली सिद्दी फतहखान मुक्काम दंडा राजपुरी जवळ होता तो घाबरून मुरुड जंजिऱ्यात जाऊन बसला आणि सिद्दी चे लोक इंग्रजांना आश्रय मागू लागले पण इंग्रजांनी आश्रय देण्यास नाकारले 9 जून 1669 च्या इंग्रज गोव्हर्नर ने सिद्दी च्या लोकांना एक पत्र लिहले त्यामध्ये तो लिहतो ' आम्हाला स्वतःचे सुरक्षा करण्यासारखे खुप आहे आणि शिवाजीशी वैर करण्याची आमची तयारी नाही'.
दंडा राजपुरी महाराजांनी जिंकून घेतली जंजिरा जमिनिकडून घेरला गेला अधून मधून समुद्रा मध्ये मराठ्यांची तारवे घिरट्या घालत होते. फहतहखानाची पण लांब पल्ल्याचा आणि प्रचंड दारू गोळा या जोरावर किल्ला अजिंक्य होता महाराजांनी त्याची कोंडी करून किल्ला घेण्याचा निर्णय घेतला आणि महाराजनचे हे अस्त्र कामी आले आणि सिद्दी उपासमारीची संकटाने टेकिस आला त्याने मोघालांच्या कडे धाव घेतली मोगलांनी महाराजांना वेढा काढून घेण्याची हुकूम दिला पण तो महाराजांनी धुडकावून लावला आता त्या सिद्दीनि कल्याण च्या लोदीखान ला किल्ला सुपूर्त करून निघून जाण्याचे ठरवले पण महाराजांनी लोदी खान ला पण दूर राखले आता सिद्दी ची पुरती कोंडी झाली तो किल्ल्याला तब्बल 6 महिने वेढा पडला होता अखेर सरंक्षणाचे आश्वासन मिळाल्यास जंजिरा महाराजांच्या हाती द्याचे ठरवले मुरुड जंजिरा स्वराज्यात दाखल होण्याची शुभ चिन्ह दिसू लागली.अचानक सिद्दी फहतहखाना जवळच्या सिद्दी संबूल ,सिद्दी याकृत ,सिद्दी खैरीयत यांनी सिद्दी फहतहखान ला कैद केले आणि सिद्दी संबूल हा जंजिऱ्याचा प्रमुख झाला आणि त्याने औरंजेबशी संबंध साधला त्यामुळे पुन्हा मोघल आणि मराठे संघर्ष चालू झाला हे मोघल रुपी मोठे संकट दूर करण्यासाठी महाराजांना माघार घेणे भाग पडले पण त्या सिद्दीची जी कोंडमारी झाली होती त्यामुळे तो चांगला दचकून होता त्यामुळे महाराजांच्या प्रदेशात धुमाकळू घालायचा कमी झाला
आरमार दिन
मराठ्यांच्या आरमाराचा स्वराज्याला झालेला फायदा थोडक्यात आढावा.
१) त्यांनी कोकण किनाऱ्यावरील जल व्यापऱ्यांच्या मालाचे युरोपीय मोघल आणि सिद्दी यांच्या पासून संरक्षण केले
२) स्वतःची ची व्यापारी जहाज व प्रजाजनाच्या व्यापाराला पूरक असे संरक्षण दिले
३)परिकीयांच्या लेखि अनुज्ञा न घेता समुद्रावर संचार करण्याचे स्वतंत्र प्रस्तापित केले
४)काळाच्या आवश्यकते नुसार इंग्रज ,अरब ,डच यांच्याशी संधी साधण्याचा देखावा करून पोर्तुगीजांना जेरील आणले
5)१६७० पर्यंत महाराजांनी त्यांचे नाविक सामर्थ्य एवढे वाढवले होते कि मुंबई च्या खाडीत 160 युद्ध नोका उभ्या करून समुद्रावर संचार करत होत्या यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या मनात चांगलाच धाक उत्पन्न केला होता
६)खांदेरीवर विजय मिळवून इंग्रज व सिद्दी याच्या संयुक्त नौदलाचा पराभव करून स्वराज्याचे नौदलाचे सामर्थ्य सर्वांच्या प्रत्येयाला आणून दिले .
7) सुरत व इतर ठिकाणी जाणाऱ्या भुदलाचे सरंक्षण व साह्य आरमाराने केले आहे.
८)जे नाविक कामगार सिद्दी आणि इंग्रज डच यांच्या समवेत काम करत होती (आपल्या भूमीतील) ती महाराजनच्या कडे आकर्षित होऊन महाराजांच्या साठी नौका बांधणीचे कामात लागली त्यामुळे त्या लोकांना रोजगार उपलब्धी झाली
९) सिद्दी ची लोक किनाऱ्या लगतच्या भागा मध्ये जी धुमाकूळ घालत होती ती बंद झाली.
१०) युरोपीय लोकांची जहाज बंदरात आल्यानंतर महाराजांचे अधिकारी कढून कडक तपासणी करून त्यांना प्रवासाची अनुज्ञा(permission) देत. त्यामुळे युरोपीय लोकांच्या व्यापारावर नियंत्रण होते.