राजापूर, विजयदुर्ग ,देवगड व मालांड च्या खाड्यामध्ये महाराजांनी नवीन 50 तारवे बांधून तयार ठेवली होतो महाराजांच्या या आरमारी तायरीमुळे पोर्तुगीज डच इंग्रज यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. महाराजांची धाड कुठे पडणार याकडे सर्वांचे लक्ष होते महाराजांचा रोख यावेळी होता बेदनूरकडे
बेदनूरराज्य शिवापप्पा नायकाच्या काळात प्रसार पावले (1645-60) आदिलशाही दुर्बलतेचा फायदा घेत त्याने आपले राज्य घाटावर आणि घाटाखाली समुद्र किनाऱ्यावर वाढवले
1660 ला शिवाप्पा नायकाचा मृत्यू झाला. आणि तिथे सत्ता संघर्ष सुरु झाला शिवाप्पा चा भाऊ वेंकटप्पा आणि मुलगा भद्राप्प या चुलत्या पुरण्यात संघर्ष चालू झाला याच काळामध्ये पोर्तुगीज आणि डच सत्ता संघर्ष पण पराकोटीला पोहचला होता याच गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी बसनूर च्या स्वारी केली
महाराज मालांडला आले व इथल्या खाडीत त्यांनी 85 छोटी व 3 मोठी गलबते स्वारीसाठी सिद्ध केली
महाराजांच्या या पहिल्या नोका रोहणाची तारीख होती 8 फेब्रुवारी 1665
याच वेळी योगायोग असा कि मुंबई बेटाचा ताबा पोर्तुगीजांनी इंग्रजांना दिला याच निमित्ताने पोर्तुगीज हे मुंबई ला गेले त्याचमुळे महाराज कोणताही विघ्न न येत गोव्याजवळून पुढे सरकले आणि बसरूर ला उतरले
मालांड पासून बसरूर पर्यंत महाराजांना वेंगुर्ले ,गोवे, कारवार ,गोकर्ण, कुमाथे ,होणावर, भटकळ ,गांगुळी हि बेटे लागतात यावरून महाराजांचा प्रवास हा नक्कीच 4 ते 5 दिवस घडला असेल
13 किंवा 14 फेब्रुवारी ला महाराज बसरूर ला पोहचले आणि छापा घालून ते पूर्ण एक दिवस लुटले. बसरूरच्या लुटीचा महाराजांना अगणित माल जड विहार कापड मौल्यवान जिन्नस सापडले. डचांच्या नोंदीनुसार महाराजांनी बसरूरच्या सात व्यापार्यांना कैद करून सोबत नेले हे व्यापारी महाराजांनी मागितलेली खंडणी न भरू शकल्याने कैदेत पडले
सभासद बखरीच्या उल्लेखा नुसार महाराजांना या स्वारीमध्ये 2 कोटी होन एवढा खजिना मिळाला
हि लूट जहाजावर लादून महाराज परतले ते गोकर्ण महाबळेश्वर ला महाराज तिथून 4000 पायदळा सोबत अकोल्यास गेले तिथून त्यांनी लुटीचा जहाजे पाठवून स्वता 4000 सैन्यासह खुश्कीच्या मार्गाने कारवार ला निघाले 22 फेब्रुवारी ला महाराज कारवार ला पोहचले .महाराज कारवार ला पोहचले हि बातमी इंग्रजांना हेरांच्या कडून कळाली होती तरी इंग्रज एवढे धास्तावले होती कि त्यांनी आपला माल मस्कतच्या एका अरबी जहाजावर भरला आणि तिथून पुढे पळून जायच्या तयारीत राहिले.

No comments:
Post a Comment