पोर्तुगीज व मराठा यांच्यात डिचोली येथे तह झाला पण या तहापूर्वी पोर्तुगीज राजा हा "साता समुद्राचा राजा" म्हणून घेऊन त्याने अरबी समुद्रात संचार करणाऱ्या इतर देशाच्या नौकाना आपले दस्तक बाळगण्यास भाग पाडीत असे हे दस्तक जे जहाज बालगीत नाहीत त्यांना दंड वसूल करत असत पोर्तुगीज्यांच्या या दंडासमोर मोघल आरमाराने पण मान तुकवली होती. मोघल जहाजे प्रमाणे आदिलशाही जहाजे पण पोर्तुगीजांचा दस्तक बाळगत होते पोर्तुगीजांच्याबर तह झाल्यानंतरर महाराजांनी दर्यासारंगला पोर्तुगीजांचे दस्तक न बाळगण्याची आज्ञा केली व आपल्या सागरी हद्दीपाशी संचार करणाऱ्या परकीय जहाजांनी आपले दस्तक बाळगण्याची द्वाही फिरवली त्यामुळे पोर्तुगीज व महाराज संबध बिघडण्यास कारण झाले. आणि हाच संघर्ष हा महाराजांच्या मृत्यू पर्यंत टिकला
.पोर्तुगीज नाविकाने महाराजांचे दस्तक बाळगण्यास नकार दिल्याने महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज आरमरावर हल्ले केले.त्यामुळे पोर्तुगीज व्यापार डाबघाई ला आला.पोर्तुगीजाणा यापुढे नमते घ्यावे लागले.20 मार्च 1679 ला पोर्तुगीजांनी एक पत्र पाठवल विनंती खातीर हे पत्र महाराजांना पाठवले होते त्यामध्ये तो म्हणतो
" ओसळणे नदीतून कर्नाटकात मीठ घेऊन जाणाऱ्या या राज्याच्या प्रजाजनाच्या नौकाना आपल्या आरमारी नौका अटकाव करीत आहेत त्या पैसे वसूल केल्याशिवाय सोडत नाहीत तरी संकेश्वर नदीत अटकेत ठेवलेल्या जहाजाची आपण मुक्तता करावी आणि हि मुक्तता झाली कि आमच्याशी कायमचा तह करण्यासाठी एक हुशार व वजनदार मनुष्य अधिकार देऊन आमच्याकडे पाठवावा"
पोर्तुगीज आणि मराठे संघर्षचं अजून एक कारण म्हणजे "चौथाई"
महाराजांनी ठाणे हा जिल्हा आपल्या स्वराज्यात जोडला तेव्हा त्या जिल्ह्यातील चौथाई वसुलीवरून पोतुगीजांशी लढा चालू झाला.
महाराजनच्या अगोदर या भागात रामनगर या नावाचे राज्य होते त्या राज्याचा राजा पोतुगीज वसाहतीतील अंतरंगत स्वाऱ्याच्या रक्षणाच्या बदली पोर्तुगीजांच्या कडून चौथाई वसूल करत असे.पण।महाराजांनी जेव्हा रामनगर व कोळी राजाचा या दोघांचा प्रदेश घेतला तेव्हा पोर्तुगीजांना चौथाई मागण्यास प्रारंभ केला पण पोर्तुगीजांनी महाराजांची मागणी धुडकावून लावता येईना तेव्हा. पोर्तुगीजांनी काही काळ कर भरला पण त्यांनी आजचे मरण उद्या ढकलले व महाराजांना पत्र पाठवून सांगितले " रामनगर च्या राजाने आमच्या कडून १६७५ च्या कराची उचल घेतली आहे त्या रामनगरच्या राजाचा सर्व मुलुख घ्या म्हणजे रामनगरच्या राजाला देत असलेला कर आम्ही तुम्हाला देतो"
पोर्तुगीजांनी असे करत काही काळ कर भरला काही काळ नाही भरला त्यामुले पुन्हा महाराजांनी फोंड्याचा किल्ला घेऊन पोर्तुगीजांना थक्क करून टाकले त्यामुळे ते आता गोव्यात शिरतील या भीतीने पोर्तुगीजांनी महाराजांना कर द्याला चालू केला. दमण मध्ये पोर्तुगुजनच्या कडून मराठे जो ग्राम खांडीचा कर वसूल करत होते तो भरण्यास मात्र पोर्तुगीजांनी चुकारपणा कधी केला नाही.
No comments:
Post a Comment