मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती घराण्यात किती राण्या होऊन गेल्या?किती कर्तबगार निघाल्या ?किती दुर्दवी व किती सुदैवी निघाल्या हा खर तर एक स्वतंत्र इतिहासाचा अभ्यास होऊ शकले परंतु येसूबाई सारख्या शहाण्या राणीने तब्बल तीस वर्ष शत्रूच्या कैदेत राहूनही आपल्या आयुष्याच्या शेवटचे पूर्व सुखात झाल्याचे भाग्य मिळाले तर ताराबाई सारख्या अत्यन्त कर्तबगार राणीला आपल्या आयुष्याच्या शेवटी हिंदवी स्वराज्याच्या सर्व सत्ता उपभोगण्याचे भाग्य मिळूनही आयुष्यच्या शेवटी सत्तास्पर्धेत पराभूत व्हावे लागले ह्या आहेत इतिहासातील काही प्रसिद्ध राण्या परंतु एक असेही नाव आहे कि ज्यांना इतिहासाने अज्ञावसात ठेवले त्याच्या विषयी एक दोन ओळी पेक्षा अधिक माहिती मिळत नाही अशाच एका राणीची हि माहिती
त्या राणीचे नाव आहे जानकीबाई ....
मराठ्यांचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची हि प्रथम पत्नी शिवछत्रपतींच्या अनेक घडामोडींनी खच्चून भरलेल्या आयुष्यात शिवाजी महाराजांच्या हातून पार पडलेले शेवटचे कार्य म्हणजे आपल्या धाकट्या पुत्राचा या जानकीबाईशी रायगडवर घडवून आणलेला विवाह समारंभ हा संभारभ झाला आणि अवघ्या तीन आठवड्यात महाराज निजधामास गेले.जानकीबाई चा उल्लेख मिळतो तो लग्नचा आणि त्यांच्या मृत्यू चा परंतु लग्नाचा उल्लॆख मिळतो तो सभासद बखरीमधून
सभासद म्हणतो कि
"धाकटा पुत्र राजाराम यास वधु पाहता प्रतापराव पूर्वी सेनापती होते त्यांची कन्या नवरी नेमस्त केली आणि लग्न सिद्ध ते पावले व वधूचे नाव सौभाग्यवती जानकीबाई असे ठविले मोठा महोच्छाह केला दानधर्म अपार केले."
सेनापती प्रतापराव गुजर यांनी महाराजाने बोल मनाशी लावून बहलोलखानावर तुटून पडले आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी धारातीर्थी आत्मसमर्पण केले.
प्रतापरावांचे हिंदवी स्वराज्यावरील ऋणातून मुक्त होण्यासाठी महाराजांनी आपला धाकटा पुत्र राजाराम महाराज यांचा विवाह प्रतापराव गुजरांची कन्येशी रायगड वर लावून दिला .
बिचाऱ्या महाराजांना काय माहिती होते कि नियतीने या जनकीच्या भाळी काय लिहून ठेवले आहे !पौराणिक काळात जानकीस 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता परन्तु त्याच्या दुप्पट म्हणजे 28 वर्षाहून अधिक काल वानवासांच्या अग्नीदिव्यातून जावे लागेलं..!
दुसरा उल्लॆख येतो तो मल्हारराव चिटणीस बखरीमध्ये त्यामध्ये उल्लेख येतो तो जानकीबाई च्या मृत्यूचा "पूर्वी प्रतापराव गुजरांची सोयरिक झाली ती वारलियावरी संभाजी महाराजांच्या काळात राजरामांची दोन लग्ने झाली एक मोहिते यांची कन्या ताराबाई व कागलकर घाटके यांची कन्या राजसाबाईसाहेब ऐशी केली होती."
तथापि डॉ आप्पासाहेब पवार यांनी संपादित केलेल्या कागदपत्रात यादव घराण्याची जी अस्सल कागदपत्र आहेत त्यामध्ये मात्र जाणिकबाई यांचा उल्लेख सापडतो
त्या कागडपत्रामुळे एक मराठ्यांच्या इतिहासातील एक अज्ञात घटना उगडकिस येते ती म्हणजे राजाराम महाराजांची हि राणी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मरण न पावता ती सन 1689 मध्ये रायगड ला जुल्फिरखान खान ने वेढा घातला तोपर्यंत जिवंत होती
राजाराम महाराजांनी रायगडचा वेढा कडक होण्यापूर्वी वेढ्यामधून निसटून प्रतापगडावर निघावे आणि मागे शाहू महाराज ( संभाजी महाराजांचे पुत्र) यांनी येसूबाई यांच्यासोबत रायगडवर राहून रायगड झुंजत ठेवावा.
परंतु राजाराम महाराजांनी प्रतापगडावर आल्यावर आपल्या मर्जीतील सेवक गिर्जोजी यादव याला एक आदेश केला त्यामध्ये रायगड वरती असणाऱ्या शाहू महाराज व जानकीबाई याना आणण्यासाठी परत रायगड वरती पाठिवले
( राजाराम महाराजांची तीन लग्ने झाली होती जानकीबाई राजसाबाई , ताराबाई या तीन राण्या होत्या परंतु रायगड सोडताना राजाराम महाराजांनी ताराबाई व राजसाबाई यांना सोबत घेतले परंतु जानकीबाई याच रायगड वरती ठेवले होते याचे कारण मात्र इतिहास देऊ शकत नाही)
रायगड मोघलांच्या ताब्यात गेला त्यावेळी रायगडावरील येसूबाई ,शाहूराजे ,सकवरबाई ( शिवाजी महाराजांची एकमेव त्या वेळी ह्यात असणारी राणी) संभाजी महाराजांचे दासी पुत्र मानसिंग व मदनसिंग यांची नावे इतिहास साधनात येतात मग जानकीबाई नाव येत नाही ..???
परंतु एका यादव काळातील कागदामध्ये एक उल्लेख सापडला त्यावरून जानकीबाई ह्या पुढे कित्येक वर्ष जिवंत होत्या एवढेच न्हवे तर मोघलांच्या कैदेत असणाऱ्या येसूबाई बरोबर यातना सोसत होत्या असे हा उल्लेख सिद्ध करतो.
सन १७१८ मध्ये पेशवा बालाजी विश्वनाथ हा जेव्हा दक्षिणेचा मोघल सुभेफर सय्यद हुसेन यांच्याशी करार करून उत्तरेत निघाला तेव्हा शाहू महाराजांनी आपल्या पेशव्याला दिल्लीतून मोहिमेतून कोणकोणत्या गोष्ट साध्य व्हायला पाहिजेत याची यादी दिली ती खालीलप्रमाणे
श्री
यादी मतलब करून घेणे
स्वराज्य थोरले कैलासवासी स्वामींचे प्रमाणे रायगड वरकड गडकोटदेखील करून घेणे ठाणी मागून घेणें
१ खटाव
२अकलूज
3 कासेगाव
4 सांगोल
5 मंगळवेढे इत्यादी
चंदी प्रांताचे राज्य गडकोटदेखील करून घेणे मातोश्री (येसूबाई) व मदनसिंगदेखील कबिले व दुर्गाबाई व जानकीबाई व सेवक लोक मागून घेणे .
म्हणजे रायगड वर बंदिवासात पडलेल्या राजपरिवारामध्ये जानकीबाई पण होत्या त्यामुळे शाहू महाराजांनी जानकीबाई व कुटुंब कबिला यांना दिल्लीतून सोडवून आणण्याचे आदेश बाळाजी विश्वनाथ याना केले म्हणजे १६८९ नंतर पुढे १७१८/१९ पर्यँत जानकीबाई मोघलांच्या कैदेत राहिल्या
जानकीबाई हि खरोखर एक दुर्दैवी स्त्री ठरली रायगडच्या पाडावाने अनेक स्वप्न ढसळली शिवाय तीस वर्ष प्रदीर्घ कैद .असे दुर्दैव येसूबाईच्या पण नशिबी आले पण आयुष्याच्या शेवटी मात्र आपला पुत्र राजा बनल्याचे भाग्य तिला नशिबी आले .मोघली कैदेत असताना अनेक यातना भोगल्या पण आयुष्यच्या शेवटी भाग्योदय पाहता आला पण राणी जानकीबाईचे काय???
मोघली आक्रमणाच्या रुपाने हिंदवी स्वराज्यावर कोसळल्या भयानक संकटाची एक मूक साक्षीदार म्हणून त्या राहिली जेवढी दुर्दैवी तेवढीच उपेक्षित इतकी कि बिचारी केव्हा कालाधिन झाली हे पण इतिहासाला ज्ञात नाही.....
No comments:
Post a Comment