लाहोरच्या रावी नदीच्या तीरावर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले आणि तेथे झालेली काँग्रेस नेत्यांची भाषणे वृत्तपत्रांतून छापून येऊ लागली रावीच्या तीरावर जमलेल्या या राष्ट्रभक्तांनी काही अखेरचे निर्णय घेतले होते आणि संपूर्ण स्वातंत्र्य हीच आमच्या देशाची एकमेव मागणी ठरवली होती. त्या अधिवेशनात २६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ठरले आणि तसे जाहीरही केले गेले.
२६ जानेवारी जसा जवळ येऊ लागला, तसा त्यात कसा भाग घ्यायचा, याची चर्चा सुरू झाली. कराड व आसपासच्या भागांमधील बहुसंख्येने लोक या कोयना कृष्णेच्या संगमावरती जमू लागली , त्या दिवशी एक प्रतिज्ञापत्रक तयार करून ते सर्वत्र छापून वाटावे आणि त्याचे वाचन करून स्वतंत्राची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून प्रतिज्ञापत्रक तयार करण्याचे काम सोपवण्यात आले यशवंतराव चव्हाण यांच्यावरती. भावनाप्रधान अशा पाच-पंचवीस वाक्यांत ते प्रतिज्ञापत्रक होते.( चव्हाण साहेबांनी लिहलेली प्रतिज्ञापत्रक प्रत कुठेही उपलब्ध नाहीये) लोकांनी त्या प्रतिज्ञापत्रकाचे स्वागत केले. ते छापून घेऊन प्रसिद्ध करायचे होते व वाटायचे होते, म्हणून दिनांक २५ लाच रात्री व्यापारी छापखान्यामध्ये प्रतिज्ञापत्रक छापून घेतले. ते छापून घेण्यास पहाटेचे चार वाजले होते. सकाळी आठ वाजता कृष्णा घाटावर झेंडावंदन होते.सर्व छपाई ची कामे उरकून प्रेसमधून सर्वजण घरी गेले आपापल्या घरी गेले. अंघोळ करून, कपडे बदलून, पुन्हा प्रेसमध्ये जमले आणि सर्व जण मिळून हरिभाऊं लाड यांच्या नेतृत्वाखाली सात वाजता कृष्णेच्या घाटावर पोहोचले .झेंडावंदनासाठी यशवंतराव चव्हाण आणि त्याचे सोबती सोडून पन्नास- साठ इतरही माणसे जमली होती. परंतु ते .प्रतिज्ञापत्रक हे शहरात पण आसपासच्या भागात वाटण्यात आले . झेंडावंदन झाले. स्वातंत्र्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करायचे, अशी मनःपूर्वक शपथ घेतली आणि स्वातंत्रसाठी लढायचे हक्काची लढाई करायची याची ठिणगी पेटली ती इथून...
कृष्णेच्या काठच्या त्या २६ जानेवारीची ती सुंदर सकाळ ,. मनात दाटलेली भावना आता प्रकट स्वरूपात व्यक्त झाली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या तिरंगी झेंड्याखाली यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिज्ञावाचन झाले आणि यशवंतराव चव्हाण यांची राजकीय जीवनाची सुरवात झाली ती खऱ्या अर्थाने याच दिवशी आणि याच कृष्णा कोयनेच्या संगमवरून
संदर्भ-कृष्णाकाठ
इतिहास आणि सह्याद्री
Monday, 11 April 2022
यशवंतराव चव्हाण यांची राजकीय जीवनाची सुरवात...
Wednesday, 1 April 2020
ऐतिहासिक कराड
नावाचाइतिहास
Saturday, 11 January 2020
।। आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत ।।
शिवचरित्रात शहाजीराजांचे स्थान आदराचे तर राजमाता जिजाऊ चे स्थान आदरयुक्त श्रद्धेचे आहे. देवगिरीच्या यादवांची शात्रा परंपरा सांगणाऱ्या जाधवांच्या कुळात त्यांचा जन्म झाला निजामशाही मध्ये एक बलाढय सरदार असणाऱ्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत्या .इतिहासात जिजाबाई सारखे भाग्य फार कमी स्त्रियांच्या वाट्याला आले असेल वीरकन्या ,वीरपत्नी, वीरमाता अशा तीन भूमिका पार पडण्याचे सौभाग्य नियतीने त्यांना बहाल केले, पण अशा सौभाग्याच्या जबाबदाऱ्या पार पडत त्यांना अनेक जहरी प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते दक्षिणीतील सुलतानी राजकारणाचे चटके त्यांना सोसावे लागत होते .भर दरबारात मुजरा करायला गेलेल्या लखुजीराव आपल्या मुला-नातवास कापून काढलेल्या वार्तेने त्यांचे मन होरपळून गेले .ज्या आदिलशाही चे कर्नाटकातील राज्य आपल्या पतीच्या पराक्रमाने वाढवले त्याच शाहीने त्यांच्या हाताला बेड्या ठोकाव्यात या घटनेने
सुलतानाच्या राजवटी विषयी त्यांची भावना तिरसकरच्या परकोटी ला पोहचले पण जिजाबाई सारख्या स्त्रीच्या मनातअशा वेळी कोणते वादळ उठले असेल? आपल्या मुलाने त्यापुढे उडी घ्यावी आणि स्वतःसाठी तख्त निर्माण करावे , स्वता वर छत्र धरावे आणि आपल्या लोकांची मराठ्यांच्या शाही स्थापन करावी आणि महत्वकांशी स्वप्न त्याने साकार केले .
जिजाबाई याची देही याची डोळा आपला पुत्र तख्तावर बसलेला छत्र धारण केलेला मराठयांच्या छत्रपती -पातशहा होताना पाहण्याचे भाग्य लाभले
जदुनाथ सरकार यांनीही या इतिहासातील महान स्त्रीच्या भाग्यकडे पाहून तिची तुलना सुप्रसिद्ध सातकर्णी राजाच्या गौतमी या राजमतेच्या बरोबर केला आहे.
" Like queenmother of the same country born 15 centries earlier. Gautami the mother of Andra king shri satkarni she (jijabai) glorified in the glory of her victorious and Orthodox son"
त्यांना संभाजी हा नावाचा पण एक कर्तबगार पुत्र होता .1636 साली ते शहाजीराजांच्या बरोबर कर्नाटकात गेले पुढे त्यांना शहाजीराजांनी बंगळूर जहागिरीवर जेष्ठ पुत्राची स्थापना केली.व पुण्याची जहागिरी शिवाजीराजांच्या कडे सुपूर्त केली. पुढे 1654 मध्ये कणकगिरीच्या लढाईत ठार झाले आणि त्यानंतर शिवाजीराजे हे एकमेव पुटे त्यांचे आशास्थान होऊन बसले.
जयराम पिंड्ये आपल्या काव्यात म्हणतात कि
"जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई लभली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे कि कीर्तीचा चंबू जबूद्विपाला ।करी सावली मुलाला ।।"
जयरामांच्या या कावणाचा अर्थ स्पष्ट करताना इतिहासाचार्य राजवाड्याची म्हंटले आहे कि "जिजाई हि शहाजीराजांच्या सारखी धीर ,उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होती आणि ती केवळ नवऱ्याच्या किर्तीवर्ती विकत नसून स्वतःच्या धीर उदार व गंभीर वृत्तीने तिची कीर्ती त्या काली सर्व भारतभर पसरली होती "
स्वराज्याचा सर्व उद्योग शिवाजमहाराज आपल्या मातेच्या आशीर्वादाने केला .अफझलखान वध,शाहिस्तेखान छापा ,आग्रा भेट यासारख्या धोकेबाज साहस प्रसंगी खात्रीने त्यांनी आपल्या मातेशी सल्लामसलत केली असावी.
उपरोक्त तिन्ही प्रसंगाची असे होते कि साहसी कृत्य करावयास निघालेले महाराज निश्चितपणे परत येणार याविषयी शंभर टक्के खात्री कोणाच देऊ शकले नसते .अशा प्रसंगी आपल्यामागे आपल्या राज्याचा कारभार आपल्या मातेवर सोपवून महाराज जात असत बाल शिवाजीला राजसदरेवर बसवून पुणे जहागिरीचा कारभार केला होता मग त्या मातेला स्वराज्याचा कारभार करणे अवघड नव्हते.पण जिजाबाईच्या प्रशासकीय कौशल्या ची खरी कसोटी लागली ती शिवाजी महाराज आग्रा ला मोघलांच्या कैदेत पडल्यावर!महाराजांच्या अनुपस्तिथ त्यांनी स्वराज्याची कारभार चोख केला असा केला कि त्या कारकिर्दीत एक हि फंदफितुरी स्वराज्यात घडून आली नाही.
जिजाबाईंना अशा अनेक प्रसंगाचे हलाहल पचिवले होते.त्यातून त्यांच्या व्यक्तिम्हत्वाचे असे रसायन तयार झाले त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला न डगमगता समोर जाण्याचे असामान्य धर्य निर्माण झाले .मातेच्या या गुणांचा संस्कार शिवाजीमहाराजांच्या जडणघडणीत पक्का रुजला होता. अशी हि माता छत्रपती शिवाजीमहाराजांच्या रुपाने अखंड भारत वर्षाला एक अनमोल राष्ट्रपुरुष देऊन गेली
संदर्भ -
१) शककर्ते शिवराय (विजय देशमुख)
२) शिवछत्रपती -एक मागोवा ( डॉ .जयसिंगराव पवार)
Saturday, 9 November 2019
अफझलखान वध
अफझल खानाला महाराजानच्या मोहिमेवर पाठवताना जोराची तयारी करण्यात आली होती या मध्ये खानसोबत 12 हजार घोडदळ ,10 हजार पायदळ अगणित हत्ती ,उंट,तोफा,दारुगोळा, याशिवाय आदिलशाहने विशेष अधिकार असलेले डौलही दिले होते(डौल म्हणजे त्यावरती बादशाही शिक्का मोर्तब झालेली कोरी कागद) तीन वर्ष मोहिम चालली तरी कुठल्या हि प्रकारचा तुटवडा पडणार नाही एवढी तयारी करून आदिलशहा ने खानाला महाराजांचा स्वारी वरती पाठवले...पण हा खान होता तरी कोण, यालाच का पाठवला असेल? हा काही जिवंत राक्षसा पेक्षा कमी नव्हता... खानाला स्वतःचा अभिमान वाटेल असेच त्याचे कर्तृत्व होते पर्वतासारखा धिप्पाड असणाऱ्या खानाला पण माहिती होते आपण उच्चकुळातील नाही पण त्याने ते त्याच्या कर्तृत्वाने भरून काढले...
--------------------------------------------
1637 -38 च्या दरम्यान खानाला कर्नाटक मोहिमे वरती पाठवण्यात आले होते या काळात खानाने श्रीरंग,पट्टण, कर्ण, पुरम ,मधुर ,बेदनूर काची या ठिकाणच्या मंडलिकांच्या वरती विजय मिळवला होता.
-----–----------------------------------
सिलोनचा अधिपती या अफझल खानामुळे आदिलशहा ला घाबरत होता .
-----------------------------------------
खानाचा दरारा कर्नाटक प्रांतात फार होता सिद्दी अंबर एक हंबशी
रणदुल्ला खानाच्या मोहिमेत सामील न होता 3 हजार घोड्या निशी सिंधनुर च्या सरहद्दी मध्ये अडून बसला तेव्हा रणदुल्ला खानाने 3 हजार स्वराणीशी अफझल खानाला त्या हबशी वर धाडले ,.अफझल खान येत आहे हे ऐकूनच त्याने स्वतःला बेड्या घातल्या व पालखी मध्ये बनुन खानच्या समोर हजर झाला
आणि म्हणला "मला पादशाही आज्ञा शिरसावंद्य आहे"
-----------------------------------------
अफझल खांन जेवढा पराक्रमी तेवढाच कपटी
शिरे पट्टणचा राजा कस्तुरीरंग याला खानाने अभय देऊन आपल्या छावणीत भेटीला बोलवून ऐनवेळी विश्वासघात करून मारले
---------------------------------------------
खान किती उलट्या काळजाचा होता हे अबे करे या एका फ्रेंच प्रवाशाने आपल्या डायरी मध्ये नोंद केले आहे कि
' या अफझल खानाला जेव्हा महाराजांच्या विरोधात मोहिमेला पाठवनार होते तेव्हा त्याने एक अमानुष कृत्य केले कि ज्या मध्ये त्याने त्याला आठ दिवस स्वतःला जणांन खाण्यात कोंडून घेतले व हा काळ त्या स्त्रियांना उपभोगण्यात चैनीत घालवला व शेवटच्या दिवशी त्याने त्या 63 स्त्रियांना विहिरीत ढकलून मारून टाकले
--------------------------------------------------------------
स्वतःच्या सुभ्याची प्रशासकीय व्यवस्था ठेवण्यात हि खान हा तत्पर होता
त्याने कसबे अफझलपुर( स्वतःच्या नावाने त्याने अफझलपुर नावाचे गाव वसवले होते ) तेथील एका
लिंगसेठी मोकादमास खानानेपाठवलेली पत्रे हि प करड्या आमलाचे परीचायक आहे तो लिहतो "जेथे आसचील तेथे जाऊन खोदून काढून जो आसिरा देऊन ठेवीन त्यास जानोबा समेत कापून काढून घानियात घालून पिलोन हे तुम्ही एकीने व तहकीक जाणणे"( म्हणजे कामचुकार पणा केला तर घाण्यात घालून पिळून काढीन अशी धमकी त्याने त्या लिंगसेठी ला दिली होती)
रयत आमचे पोगोडे आहेत म्हणजे रयत आमची मित्र आहे असे खानाची धारना त्या पत्रातून साध्य होते
--------------------------------------------------------
विजापूर मध्ये अफझल खानाने कोरलेल्या शिलालेख मध्ये तो लिहतो कि
"कातीले मूत मरिदान व काफिरान | शिकांदए बुनियादे बुतान| असे संबोधतो
'मी काफिर व बंडखोरी कत्तल करणारा व मूर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे ' त्या शिवाय तो सांगतो कि
"दिन दार भूतशिकन "व दिन दार कुफ्रशिकनं" अशी विशेषणे तो स्वतःला लावतो म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्तीचा विध्वंसक
------------------------------------------------------
अफझल खानाचा फारशी भाषेतील शिक्का उपलबध आहे त्यामध्ये तो म्हणतो
! गर अजा कुनद शसपहार अअला फजल फुजला व फजल अफजल – अज हर मलकी बजाए तश्स्बह आवाज आयद की अफजल अफजल याचा अथा असा की “आकािाने उत्कृष्ट्ट व्यक्तींची उत्कृष्ट्टता आणण अफजलची उत्कृष्ट्टता यांची तुलना केली तर जप माळेच्या मण्यासारखा प्रत्येक देवदुताकडून आवाज येईल अफजल अफझल!! अफझल हाच सवाश्रेष्ट्ठ आहे”
-----------------------------------------------------------
हा एवढा कपटी, पराक्रमी, स्वतःचे कर्तृत्व दक्षिण कर्नाटक मध्ये पासरवणारा, धिप्पाड ,तेवढाच चालक एक प्रशासक असा हा अफझल खान हा या सह्याद्रीतल्या सिंहाची शिकार करायला चाललं होता....हा एवढा पराक्रमी, चालाख, कर्तृत्वान खानाचे पण आपल्या महाराजांच्या पुढे काही चालले नाही.. शेवट वाई वरून खानाला प्रतापगड च्या पायथ्याला आणला आणि तेथून तो मागार जाणार नाही याचा चोक बंदोबस्त करून
10 नोव्हेंबर 1659 ला अफझल खान नावाचा 32 दातांचा बोकड भवानी मातेला अर्पण करून पुणे दक्षिण भारत हालवून ठेवणारा प्रताप महाराजांनी केला ज्याचा पडसात हा पूर्ण भारतभर उमटला
#उदंड_राजकारण
#parfect_planing
संदर्भ- शककर्ते शिवराय
- अफझल खान वध
ऋषिकेश चिंचकर
Sunday, 29 September 2019
जागर स्रीशक्तीचा - सावित्रीबाई फुले
महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य होय.
१मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला (जोतीराव फुलेंची ची मावस बहीण सगुणा )मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.१८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर तेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी समजून घेतले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. १८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.महात्मा फुले यांच्या निधन (इ.स. १८९०) झाला. त्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.इ.स. १८९६ साली दुष्काळ पडला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
समजातल्या दिन : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बलीकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
_______________________________
स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार करणारी एक छोटस काव्य
जाणीव-जागृतीचे काव्य : –
कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई
__________________________________
______________________
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
________________________________
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
१)पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा ’सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
2)महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
३) चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
४)महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
५) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ’आदर्श माता’ पुरस्कार
६)क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
७) सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्शमाता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न, वगैरे.
८) मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
९) क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
१०) मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)
Tuesday, 10 September 2019
#savefort
लोकांची जी किल्ल्यावर हॉटेल होणार आहे का नाही यावरती जी दिशाभूल केली जातेय त्याबद्दल काही लोकांच्या शंका
प्रश्न -किल्ले भाड्याने देणे आणि त्यावरती हॉटेल बांधणे हि बातमी खरी आहे का?
खाली पोस्ट आणि 2016 साली किल्ल्यावर हॉटेल बांधनार आहेत याबाबद्दल झालेला Jr चा फोटो आणि पूर्ण jr ची लिंक देतोय
या बद्दल माहिती असणारी मालोजीराव जगदाळे याची पोस्ट ची लिंक देतोय खाली टाकतोय
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10219721357446514&id=1295319406
JR ची लिंक खाली
https://drive.google.com/file/d/1b87P1vs73YVqZlVbXWLhurauWwhkSvug/view?usp=drivesdk
या गडकिल्लयावर हॉटेल बांधण्या संबधी झालेली मीटिंग ची लिंक
मिळालेली मान्यता
https://drive.google.com/file/d/1K9zIF3ShQV_RWrYuzXB4ImTRVX3mRVBa/view?usp=drivesdk
प्रश्न-
आणि याला आता स्थगिती मिळाली आहे मग कशाला विरोध करायचा
उत्तर -
स्थगिती मिळणे आणि रद्द करणे यात फरक असतो विधानसभेच्या तोंडावर हा निर्णयाला स्थगिती मिळाली आहे पण रद्द नाही झाला
हे लोक पुढे कशाचा घाट घालतील आपण त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2925727427498487&id=100001837757600
प्रश्न- पुण्याजवळील जाधवगड याला 300 वर्षाचा इतिहास आहे मग तिथे 2007 साली हॉटेल बांधले मग आधीच्या सरकार पण मोघलाईचे होते?
उत्तर- जाधवगड नाही तर ती गढी आहे
वैयक्तिक मालकीचा वाडा आणि गड यांतील फरक न समजणारे लोक जेव्हा जाधवगडीवर टिप्पणी करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची किव करावशी वाटत
प्रश्न हा राजकीय आहे पण बऱ्याच दोस्तानी विचारला म्हणून
अमोल कोल्हे नि गडावर शूटिंग केले होते रोमँटिक त्याच काय
उत्तर- मी त्या व्यतिरिक्त त्याच किल्ल्यावर 4 मराठी आणि 1 हिंदी मूवी चे शूटिंग झालेले आहे अस सांगतो पण अमोल कोल्हे विरोधी पक्षात आहेत म्हणून त्यांनाच पुढे केले जातंय मी सारवा सारव करत नाही तर काही लोक आपली दिशा भूल कशी करत आहेत हे सांगतोय
मुळात असले प्रश्न विचारणाऱ्य लोकांना माजे सांगणे आहे कि तुम्ही किल्ल्यावर हॉटेल बांधायच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध नाही केला तरी चालेल इथे लढणारी भरपूर आहेत तुमचे पक्ष प्रेम असेच डांगी मध्ये घालून घ्या
Sunday, 17 March 2019
शिवप्रताप...
अफझल खानाला महाराजनच्या मोहिमेवर पाठवताना जोराची तयारी करण्यात आली होती या मध्ये खानसोबत 12 हजार घोडदळ ,10 हजार पायदळ अगणित हत्ती ,उंट,तोफा,दारुगोळा, याशिवाय आदिलशाहने विशेष अधिकार असलेले डौलही दिले होते(डौल म्हणजे त्यावरती बादशाही शिक्का मोर्तब झालेली कोरी कागद) तीन वर्ष मोहिम चालली तरी कुठल्या हि प्रकारचा तुटवडा पडणार नाही एवढी तयारी करून आदिलशहा ने खानाला महाराजांचा स्वारी वरती पाठवले...पण हा खान होता तरी कोण, यालाच का पाठवला असेल? हा काही जिवंत राक्षसा पेक्षा कमी नव्हता... खानाला स्वतःचा अभिमान वाटेल असेच त्याचे कर्तृत्व होते पर्वतासारखा धिप्पाड असणाऱ्या खानाला पण माहिती होते आपण उच्चकुळातील नाही पण त्याने ते त्याच्या कर्तृत्वाने भरून काढले...
--------------------------------------------
1637 -38 च्या दरम्यान खानाला कर्नाटक मोहिमे वरती पाठवण्यात आले होते या काळात खानाने श्रीरंग,पट्टण, कर्ण, पुरम ,मधुर ,बेदनूर काची या ठिकाणच्या मंडलिकांच्या वरती विजय मिळवला होता.
-----–----------------------------------
सिलोनचा अधिपती या अफझल खानामुळे आदिलशहा ला घाबरत होता .
-----------------------------------------
खानाचा दरारा कर्नाटक प्रांतात फार होता सिद्दी अंबर एक हंबशी
रणदुल्ला खानाच्या मोहिमेत सामील न होता 3 हजार घोड्या निशी सिंधनुर च्या सरहद्दी मध्ये अडून बसला तेव्हा रणदुल्ला खानाने 3 हजार स्वराणीशी अफझल खानाला त्या हबशी वर धाडले ,.अफझल खान येत आहे हे ऐकूनच त्याने स्वतःला बेड्या घातल्या व पालखी मध्ये बनुन खानच्या समोर हजर झाला
आणि म्हणला "मला पादशाही आज्ञा शिरसावंद्य आहे"
-----------------------------------------
अफझल खांन जेवढा पराक्रमी तेवढाच कपटी
शिरे पट्टणचा राजा कस्तुरीरंग याला खानाने अभय देऊन आपल्या छावणीत भेटीला बोलवून ऐनवेळी विश्वासघात करून मारले
---------------------------------------------
खान किती उलट्या काळजाचा होता हे अबे करे या एका फ्रेंच प्रवाशाने आपल्या डायरी मध्ये नोंद केले आहे कि
' या अफझल खानाला जेव्हा महाराजांच्या विरोधात मोहिमेला पाठवनार होते तेव्हा त्याने एक अमानुष कृत्य केले कि ज्या मध्ये त्याने त्याला आठ दिवस स्वतःला जणांन खाण्यात कोंडून घेतले व हा काळ त्या स्त्रियांना उपभोगण्यात चैनीत घालवला व शेवटच्या दिवशी त्याने त्या 63 स्त्रियांना विहिरीत ढकलून मारून टाकले
--------------------------------------------------------------
स्वतःच्या सुभ्याची प्रशासकीय व्यवस्था ठेवण्यात हि खान हा तत्पर होता
त्याने कसबे अफझलपुर( स्वतःच्या नावाने त्याने अफझलपुर नावाचे गाव वसवले होते ) तेथील एका
लिंगसेठी मोकादमास खानानेपाठवलेली पत्रे हि प करड्या आमलाचे परीचायक आहे तो लिहतो "जेथे आसचील तेथे जाऊन खोदून काढून जो आसिरा देऊन ठेवीन त्यास जानोबा समेत कापून काढून घानियात घालून पिलोन हे तुम्ही एकीने व तहकीक जाणणे"( म्हणजे कामचुकार पणा केला तर घाण्यात घालून पिळून काढीन अशी धमकी त्याने त्या लिंगसेठी ला दिली होती)
रयत आमचे पोगोडे आहेत म्हणजे रयत आमची मित्र आहे असे खानाची धारना त्या पत्रातून साध्य होते
--------------------------------------------------------
विजापूर मध्ये अफझल खानाने कोरलेल्या शिलालेख मध्ये तो लिहतो कि
"कातीले मूत मरिदान व काफिरान | शिकांदए बुनियादे बुतान| असे संबोधतो
'मी काफिर व बंडखोरी कत्तल करणारा व मूर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे ' त्या शिवाय तो सांगतो कि
"दिन दार भूतशिकन "व दिन दार कुफ्रशिकनं" अशी विशेषणे तो स्वतःला लावतो म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्तीचा विध्वंसक
------------------------------------------------------
अफझल खानाचा फारशी भाषेतील शिक्का उपलबध आहे त्यामध्ये तो म्हणतो
! गर अजा कुनद शसपहार अअला फजल फुजला व फजल अफजल – अज हर मलकी बजाए तश्स्बह आवाज आयद की अफजल अफजल याचा अथा असा की “आकािाने उत्कृष्ट्ट व्यक्तींची उत्कृष्ट्टता आणण अफजलची उत्कृष्ट्टता यांची तुलना केली तर जप माळेच्या मण्यासारखा प्रत्येक देवदुताकडून आवाज येईल अफजल अफझल!! अफझल हाच सवाश्रेष्ट्ठ आहे”
-----------------------------------------------------------
हा एवढा कपटी, पराक्रमी, स्वतःचे कर्तृत्व दक्षिण कर्नाटक मध्ये पासरवणारा, धिप्पाड ,तेवढाच चालक एक प्रशासक असा हा अफझल खान हा या सह्याद्रीतल्या सिंहाची शिकार करायला चाललं होता....हा एवढा पराक्रमी, चालाख, कर्तृत्वान खानाचे पण आपल्या महाराजांच्या पुढे काही चालले नाही.. शेवट वाई वरून खानाला प्रतापगड च्या पायथ्याला आणला आणि तेथून तो मागार जाणार नाही याचा चोक बंदोबस्त करून
10 नोव्हेंबर 1659 ला अफझल खान नावाचा 32 दातांचा बोकड भवानी मातेला अर्पण करून पुणे दक्षिण भारत हालवून ठेवणारा प्रताप महाराजांनी केला ज्याचा पडसात हा पूर्ण भारतभर उमटला
#उदंड_राजकारण
#parfect_planing
संदर्भ- शककर्ते शिवराय
- अफझल खान वध
- पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज