Saturday, 11 January 2020

।। आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत ।।

शिवचरित्रात शहाजीराजांचे स्थान आदराचे तर राजमाता जिजाऊ चे स्थान आदरयुक्त श्रद्धेचे आहे. देवगिरीच्या यादवांची शात्रा परंपरा सांगणाऱ्या जाधवांच्या कुळात त्यांचा जन्म झाला निजामशाही मध्ये एक बलाढय सरदार असणाऱ्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत्या .इतिहासात जिजाबाई सारखे भाग्य फार कमी स्त्रियांच्या वाट्याला आले असेल वीरकन्या ,वीरपत्नी, वीरमाता अशा तीन भूमिका पार पडण्याचे सौभाग्य नियतीने त्यांना बहाल केले, पण अशा सौभाग्याच्या जबाबदाऱ्या पार पडत त्यांना अनेक जहरी प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते दक्षिणीतील सुलतानी राजकारणाचे चटके त्यांना सोसावे लागत होते .भर दरबारात मुजरा करायला गेलेल्या लखुजीराव आपल्या मुला-नातवास कापून काढलेल्या वार्तेने त्यांचे मन होरपळून गेले .ज्या आदिलशाही चे कर्नाटकातील राज्य आपल्या पतीच्या पराक्रमाने वाढवले त्याच शाहीने त्यांच्या हाताला बेड्या ठोकाव्यात या घटनेने
सुलतानाच्या राजवटी विषयी त्यांची भावना  तिरसकरच्या परकोटी ला पोहचले पण जिजाबाई सारख्या स्त्रीच्या मनातअशा वेळी  कोणते वादळ उठले असेल? आपल्या मुलाने त्यापुढे उडी घ्यावी आणि स्वतःसाठी तख्त निर्माण करावे , स्वता वर छत्र धरावे आणि आपल्या लोकांची मराठ्यांच्या शाही स्थापन  करावी आणि महत्वकांशी स्वप्न त्याने साकार केले .
जिजाबाई याची देही याची डोळा आपला पुत्र तख्तावर बसलेला छत्र धारण केलेला मराठयांच्या छत्रपती -पातशहा होताना पाहण्याचे भाग्य लाभले
जदुनाथ सरकार यांनीही या इतिहासातील महान स्त्रीच्या भाग्यकडे पाहून तिची तुलना सुप्रसिद्ध सातकर्णी राजाच्या गौतमी या राजमतेच्या बरोबर केला आहे.
" Like queenmother  of the same country born 15 centries earlier. Gautami the mother of Andra king shri satkarni she (jijabai) glorified in the glory of her victorious and Orthodox son"
त्यांना संभाजी हा नावाचा पण एक कर्तबगार पुत्र होता .1636 साली ते शहाजीराजांच्या बरोबर कर्नाटकात गेले  पुढे त्यांना शहाजीराजांनी बंगळूर जहागिरीवर जेष्ठ पुत्राची स्थापना केली.व पुण्याची जहागिरी शिवाजीराजांच्या कडे सुपूर्त केली. पुढे 1654  मध्ये कणकगिरीच्या लढाईत ठार झाले आणि त्यानंतर शिवाजीराजे हे एकमेव पुटे त्यांचे आशास्थान होऊन बसले.
जयराम पिंड्ये आपल्या काव्यात  म्हणतात कि

"जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई लभली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे कि कीर्तीचा चंबू जबूद्विपाला ।करी सावली मुलाला ।।"

जयरामांच्या या कावणाचा अर्थ स्पष्ट करताना इतिहासाचार्य राजवाड्याची म्हंटले आहे कि "जिजाई हि शहाजीराजांच्या सारखी धीर ,उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होती आणि ती केवळ नवऱ्याच्या किर्तीवर्ती  विकत नसून स्वतःच्या धीर उदार व गंभीर वृत्तीने तिची कीर्ती त्या काली सर्व भारतभर पसरली होती "
स्वराज्याचा  सर्व उद्योग शिवाजमहाराज आपल्या मातेच्या आशीर्वादाने केला .अफझलखान वध,शाहिस्तेखान छापा ,आग्रा भेट यासारख्या धोकेबाज साहस प्रसंगी खात्रीने त्यांनी आपल्या मातेशी सल्लामसलत केली असावी.
उपरोक्त तिन्ही प्रसंगाची असे होते कि साहसी कृत्य करावयास निघालेले महाराज निश्चितपणे परत येणार याविषयी शंभर टक्के खात्री कोणाच देऊ शकले नसते .अशा प्रसंगी आपल्यामागे आपल्या राज्याचा कारभार आपल्या मातेवर सोपवून महाराज जात असत बाल शिवाजीला राजसदरेवर बसवून पुणे जहागिरीचा कारभार केला होता मग त्या मातेला स्वराज्याचा कारभार करणे अवघड नव्हते.पण जिजाबाईच्या प्रशासकीय कौशल्या ची खरी कसोटी लागली ती शिवाजी महाराज आग्रा ला मोघलांच्या कैदेत पडल्यावर!महाराजांच्या अनुपस्तिथ त्यांनी स्वराज्याची कारभार चोख केला असा केला कि त्या कारकिर्दीत एक हि फंदफितुरी स्वराज्यात घडून आली नाही.
जिजाबाईंना अशा अनेक प्रसंगाचे हलाहल पचिवले होते.त्यातून त्यांच्या व्यक्तिम्हत्वाचे असे रसायन तयार झाले त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला न डगमगता समोर जाण्याचे असामान्य धर्य निर्माण झाले .मातेच्या या गुणांचा संस्कार शिवाजीमहाराजांच्या जडणघडणीत पक्का रुजला होता. अशी हि माता छत्रपती शिवाजीमहाराजांच्या रुपाने अखंड भारत वर्षाला एक अनमोल राष्ट्रपुरुष देऊन गेली

संदर्भ -

१) शककर्ते शिवराय (विजय देशमुख)

२) शिवछत्रपती -एक मागोवा ( डॉ .जयसिंगराव पवार)

No comments:

Post a Comment