Monday, 11 April 2022

यशवंतराव चव्हाण यांची राजकीय जीवनाची सुरवात...


लाहोरच्या रावी नदीच्या तीरावर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले आणि तेथे झालेली काँग्रेस नेत्यांची भाषणे वृत्तपत्रांतून छापून येऊ लागली  रावीच्या तीरावर जमलेल्या या राष्ट्रभक्तांनी काही अखेरचे निर्णय घेतले होते आणि संपूर्ण स्वातंत्र्य हीच आमच्या देशाची एकमेव मागणी ठरवली होती. त्या अधिवेशनात २६ जानेवारी १९३० रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे ठरले आणि तसे जाहीरही केले गेले.
२६ जानेवारी जसा जवळ येऊ लागला, तसा त्यात कसा भाग घ्यायचा, याची चर्चा सुरू झाली. कराड व आसपासच्या भागांमधील बहुसंख्येने लोक या कोयना कृष्णेच्या संगमावरती   जमू लागली , त्या दिवशी एक प्रतिज्ञापत्रक तयार करून ते सर्वत्र छापून वाटावे आणि त्याचे  वाचन करून  स्वतंत्राची भावना लोकांच्या  मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून प्रतिज्ञापत्रक तयार करण्याचे काम सोपवण्यात आले यशवंतराव चव्हाण यांच्यावरती.  भावनाप्रधान अशा पाच-पंचवीस वाक्यांत ते प्रतिज्ञापत्रक होते.( चव्हाण साहेबांनी लिहलेली प्रतिज्ञापत्रक प्रत कुठेही उपलब्ध नाहीये)  लोकांनी त्या  प्रतिज्ञापत्रकाचे स्वागत केले. ते छापून घेऊन प्रसिद्ध करायचे होते व वाटायचे होते, म्हणून दिनांक २५ लाच रात्री व्यापारी छापखान्यामध्ये प्रतिज्ञापत्रक छापून घेतले. ते छापून घेण्यास पहाटेचे चार वाजले होते. सकाळी आठ वाजता कृष्णा घाटावर झेंडावंदन होते.सर्व छपाई ची कामे उरकून  प्रेसमधून सर्वजण घरी गेले  आपापल्या घरी गेले. अंघोळ करून, कपडे बदलून, पुन्हा प्रेसमध्ये जमले आणि सर्व जण मिळून हरिभाऊं लाड यांच्या  नेतृत्वाखाली सात वाजता कृष्णेच्या घाटावर पोहोचले .झेंडावंदनासाठी यशवंतराव चव्हाण आणि त्याचे  सोबती सोडून  पन्नास- साठ इतरही माणसे जमली होती. परंतु ते .प्रतिज्ञापत्रक हे शहरात पण आसपासच्या भागात वाटण्यात आले . झेंडावंदन झाले. स्वातंत्र्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करायचे, अशी मनःपूर्वक शपथ घेतली आणि स्वातंत्रसाठी लढायचे हक्काची लढाई करायची याची ठिणगी पेटली ती इथून...
कृष्णेच्या काठच्या त्या २६ जानेवारीची ती सुंदर सकाळ ,. मनात दाटलेली भावना आता प्रकट स्वरूपात व्यक्त झाली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या तिरंगी झेंड्याखाली  यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिज्ञावाचन झाले आणि यशवंतराव चव्हाण यांची राजकीय जीवनाची सुरवात झाली ती खऱ्या अर्थाने याच दिवशी आणि याच कृष्णा कोयनेच्या संगमवरून
संदर्भ-कृष्णाकाठ


No comments:

Post a Comment