Wednesday, 1 April 2020

ऐतिहासिक कराड

●कराड

नावाचाइतिहास
कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर होते. येथे स्थित असलेल्या पुरातन हट्केश्वर मंदिरावरून हे नाव प्रसिद्ध झाले. नंतर त्याचे रूपांतर करहाटक असे झाले. कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले.
कराड च्या आसपास व कराड मध्ये काही अश्यामयुगीन हत्यारे पण सापडली आहेत त्यामुळे कराड चा इतिहास चालू होतो तो अश्यमयुगापासूनच.

●मशीद व मनोरे -
-----------------------------------------------------------
विजापूरचा पांचवा राजा, पहिला अल्ली अदील शहाच्या वेळेस इब्राहिमखान नांवाच्या इसमाने १५५७ मध्ये ही मशीद बांधिली असें तिच्यावरील लेखांवरून दिसून येतें.  मशीदींतील खांबावर आरबी भाषेंत एकंदर नऊ लेख आहेत.  मनोरे १०६ फूट उंच आहेत.  त्यांच्या डाव्या बाजूस मुशाफरखाना व हमामखाना (स्नानगृह) आहे व उजव्या बाजूस मशीद आहे. विजापूरच्या राजानें यांत पूर्वी नेमलेल्या काजीचा वंशज अद्याप आहे.
मनोऱ्यांच्या शिखरांवर जाण्यासाठी आतून गोलाकार दगडी जीने बांधण्यात आले आहेत. 
औरंगजेबचा कराड संगम वरती तळ होता त्या वेळी औरंगजेब हा या मशीद मध्ये नमाज साठी येत होता
संदर्भ  - satara gazetteer

● कराड जवळच्या बौद्धकालीन लेणी 
----------------------------------------------------
प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर'  असे पडले असावे असे  म्हणतात या ठिकाणी . नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला.
 जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत. 
तृतीय कृष्ण ( सन  939 - 967 ) त्याला "सकलदक्षिणादिग अधिपती " हे त्याचे बिरुद होत.
 त्याचे कराड जवळचे सन 959  चे  दोन ताम्रपत्र महत्वाचे आहेत त्यात त्याने लिहले आहे
"गगनशिव नामक व्यक्तीस मिरज व कराड जवळ चे काही गावे  दान दिले आहेत "आणि दुसऱ्या पत्रात या लेण्यांचा उल्लेख सापडतो
त्यामध्ये " कराड  येथे कोरल्या गेलेल्या बौद्ध लेणीत राहणाऱ्या भिक्षु  ची काळजीघेण्या बाबत  या पत्रात नमूद केले आहे" म्हणजे दहाव्या शतका पर्यँत या लेण्याची काळजी घेतली जात होती असे हि यावरून दिसून येते.
संदर्भ-  satara gazetteer

●नकट्या रावळाची विहीर : पंताचा कोट
-----------------------------------------------------------
कराड शहराच्या वायव्येस एका टेकडीवर प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. तेथे असणाऱ्या पायविहिरीला स्थानिक नागरिक नकट्या रावळ्याची विहीर म्हणून ओळखतात. दगड आणि पांढऱ्या मातीमध्ये बांधलेला पंतांचा कोट आणि कोटामधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडीव दगडांच्या प्रशस्त पायऱ्या असलेली प्राचीन गूढ ' नकट्या रावळाची ' ही विहीर सुमारे ४१.५ मीटर लांब असून, त्यात ३०.५ मीटर लांबीचा सोपानमार्ग व खाली ११ बाय ११ मीटर चौरसाकृती पाण्याची विहीर आहे. विहिरीत उतरण्यासाठी ८४ पायऱ्या असून आतील बाजूस असलेल्या कमानीवर नक्षीकाम केलेले आहे. प्रत्येक २० पायऱ्यांनंतर एक मोठी पायरी  आहे. पायऱ्या संपतात त्या ठिकाणी दोन मोठ्या दगडी स्तंभावर एक मोठी कमान आहे. या कमानीत दोन उपमार्ग आहेत. १२व्या शतकात 'शिलाहार' राजवटीत नकट्या रावळ्याच्या ही ऐतिहासिक विहिर बांधण्यात आली होती.
1844  साली आलेल्या पुरा मध्ये हा कोट नदीच्या काठी असल्यामुळे पूर्ण पडला.

● शहाजी महाराज आणि कराड
---------------------------------------------------------------
सन 1636 मध्ये अहमदनगर च्या निजामशाही चा अस्त झाला आणि शहाजी राजे आदिलशाही मध्ये दाखल झाले तेव्हा महमूद आदिलशाह याने त्यांना पुण्याची जहागिरी कायम केली शिवाय 
"राजा " हा 'किताब देऊन कराड परगण्यातील 22 गावाची देशमुखी दिली यामध्ये मसूर नावाचे गडकोट असणारे महत्वाचे गाव होते
संदर्भ- महाराष्ट्राचा इतिहास

शिवाजी महाराज आणि कराड 
--------------------------------------------------------------
 ●सदाशिवगड
सदाशिवगडचा डोंगर अफझल खानाच्या वधानंतर (१० नोव्हेम्बर १६५९ ) छत्रपती शिवाजीच्या ताब्यात आला. कऱ्हाडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस-विटा कडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी शिवाजी महाराजांनी सदाशिवगड बांधून काढला.
●वसंतगड 
 किल्ल्याची बांधणी १२ व्या शतकात शिलाघर राजा भोज याने केली. इ.स. १६५९ मध्ये शिवरायांनी किल्ला स्वराज्यात आणला. गडाजवळच मसुरला सुलतानजी जगदाळे रहात होता. अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी जगदाळे त्यास जाऊन मिळाला. अफजल वधानंतर मराठ्यांनी अचानक छापा घालून जगदाळेस पकडून वसंतगडावर आणले व त्याचा शिरच्छेद केला. त्याच वेळी सातारा ,कराड ,सांगली  व जवळपास चे किल्ले महाराजांनी जिंकून घेतले .पुढे जिंजीहून परतल्यावर राजाराम महाराज काही दिवस या किल्ल्यावर मुक्कामाला होते
वारणेचा तह झाला त्यावेळी शाहू महाराज या किल्ल्यावर येऊन गेले होते. स्वराज्यच्या तीन छत्रपती च्या पद स्पर्शाने पावन झालेला हा गड.

●शाहू महाराज व ताराराणी आणि कराड
----------------------------------------------------------------------
वारणेचा तह  
करवीर येथे ताराराणींचा पुत्र शिवाजी हा छत्रपती होता. पण ताराराणींची सवत राजसाबाई यांचा पुत्र संभाजी याने शिवाजीस पदच्युत करून करवीरची गादी काबीज केली. समेट घडवून आणण्यासाठी शाहू अधिक उत्सुक होते. गृहकलह लवकर मिटावा व शत्रूचा बिमोड करावा म्हणून शाहू महाराजांचे प्रयत्न होते. महाराणी येसूबाई सुटून आल्यावर त्यांच्या सांगण्यावरून शाहू महाराज यांनी कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजे यांच्याशी तह केला. कऱ्हाडजवळ कृष्णेकाठी जखिणवाडी येथे भव्य मंडपात शाहू व संभाजीराजे यांची भेट झाली. या तहात वारणा नदीच्या दक्षिणेकडील मुलुख, किल्ले, ठाणी, संभाजी राजांस देवून दोघांमध्ये स्नेह झाला. वारणा नदी ही सरहद्द ठरल्यामुळे यास वारणेचा तह म्हणतात. संभाजी राजांशी स्नेह करून शाहूंनी मराठ्यातील कौटुंबिक प्रेम प्रदर्शित केले.
संदर्भ -  मराठा कालखंड भाग 2
-------------------------------------------------------------
१)  मशीद व मनोरे
2) बुद्धकालीन लेणी
३) वसंतगड
४) नकट्या रावळ्याची विहीर
५)वारणेच्या तहातील जखिनवाडी गावात असणाऱ्या तलवारी फोटो - सफर मराठी
 
 -ऋषिकेश चिंचकर

Saturday, 11 January 2020

।। आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत ।।

शिवचरित्रात शहाजीराजांचे स्थान आदराचे तर राजमाता जिजाऊ चे स्थान आदरयुक्त श्रद्धेचे आहे. देवगिरीच्या यादवांची शात्रा परंपरा सांगणाऱ्या जाधवांच्या कुळात त्यांचा जन्म झाला निजामशाही मध्ये एक बलाढय सरदार असणाऱ्या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत्या .इतिहासात जिजाबाई सारखे भाग्य फार कमी स्त्रियांच्या वाट्याला आले असेल वीरकन्या ,वीरपत्नी, वीरमाता अशा तीन भूमिका पार पडण्याचे सौभाग्य नियतीने त्यांना बहाल केले, पण अशा सौभाग्याच्या जबाबदाऱ्या पार पडत त्यांना अनेक जहरी प्रसंगांना तोंड द्यावे लागत होते दक्षिणीतील सुलतानी राजकारणाचे चटके त्यांना सोसावे लागत होते .भर दरबारात मुजरा करायला गेलेल्या लखुजीराव आपल्या मुला-नातवास कापून काढलेल्या वार्तेने त्यांचे मन होरपळून गेले .ज्या आदिलशाही चे कर्नाटकातील राज्य आपल्या पतीच्या पराक्रमाने वाढवले त्याच शाहीने त्यांच्या हाताला बेड्या ठोकाव्यात या घटनेने
सुलतानाच्या राजवटी विषयी त्यांची भावना  तिरसकरच्या परकोटी ला पोहचले पण जिजाबाई सारख्या स्त्रीच्या मनातअशा वेळी  कोणते वादळ उठले असेल? आपल्या मुलाने त्यापुढे उडी घ्यावी आणि स्वतःसाठी तख्त निर्माण करावे , स्वता वर छत्र धरावे आणि आपल्या लोकांची मराठ्यांच्या शाही स्थापन  करावी आणि महत्वकांशी स्वप्न त्याने साकार केले .
जिजाबाई याची देही याची डोळा आपला पुत्र तख्तावर बसलेला छत्र धारण केलेला मराठयांच्या छत्रपती -पातशहा होताना पाहण्याचे भाग्य लाभले
जदुनाथ सरकार यांनीही या इतिहासातील महान स्त्रीच्या भाग्यकडे पाहून तिची तुलना सुप्रसिद्ध सातकर्णी राजाच्या गौतमी या राजमतेच्या बरोबर केला आहे.
" Like queenmother  of the same country born 15 centries earlier. Gautami the mother of Andra king shri satkarni she (jijabai) glorified in the glory of her victorious and Orthodox son"
त्यांना संभाजी हा नावाचा पण एक कर्तबगार पुत्र होता .1636 साली ते शहाजीराजांच्या बरोबर कर्नाटकात गेले  पुढे त्यांना शहाजीराजांनी बंगळूर जहागिरीवर जेष्ठ पुत्राची स्थापना केली.व पुण्याची जहागिरी शिवाजीराजांच्या कडे सुपूर्त केली. पुढे 1654  मध्ये कणकगिरीच्या लढाईत ठार झाले आणि त्यानंतर शिवाजीराजे हे एकमेव पुटे त्यांचे आशास्थान होऊन बसले.
जयराम पिंड्ये आपल्या काव्यात  म्हणतात कि

"जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई लभली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे कि कीर्तीचा चंबू जबूद्विपाला ।करी सावली मुलाला ।।"

जयरामांच्या या कावणाचा अर्थ स्पष्ट करताना इतिहासाचार्य राजवाड्याची म्हंटले आहे कि "जिजाई हि शहाजीराजांच्या सारखी धीर ,उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होती आणि ती केवळ नवऱ्याच्या किर्तीवर्ती  विकत नसून स्वतःच्या धीर उदार व गंभीर वृत्तीने तिची कीर्ती त्या काली सर्व भारतभर पसरली होती "
स्वराज्याचा  सर्व उद्योग शिवाजमहाराज आपल्या मातेच्या आशीर्वादाने केला .अफझलखान वध,शाहिस्तेखान छापा ,आग्रा भेट यासारख्या धोकेबाज साहस प्रसंगी खात्रीने त्यांनी आपल्या मातेशी सल्लामसलत केली असावी.
उपरोक्त तिन्ही प्रसंगाची असे होते कि साहसी कृत्य करावयास निघालेले महाराज निश्चितपणे परत येणार याविषयी शंभर टक्के खात्री कोणाच देऊ शकले नसते .अशा प्रसंगी आपल्यामागे आपल्या राज्याचा कारभार आपल्या मातेवर सोपवून महाराज जात असत बाल शिवाजीला राजसदरेवर बसवून पुणे जहागिरीचा कारभार केला होता मग त्या मातेला स्वराज्याचा कारभार करणे अवघड नव्हते.पण जिजाबाईच्या प्रशासकीय कौशल्या ची खरी कसोटी लागली ती शिवाजी महाराज आग्रा ला मोघलांच्या कैदेत पडल्यावर!महाराजांच्या अनुपस्तिथ त्यांनी स्वराज्याची कारभार चोख केला असा केला कि त्या कारकिर्दीत एक हि फंदफितुरी स्वराज्यात घडून आली नाही.
जिजाबाईंना अशा अनेक प्रसंगाचे हलाहल पचिवले होते.त्यातून त्यांच्या व्यक्तिम्हत्वाचे असे रसायन तयार झाले त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला न डगमगता समोर जाण्याचे असामान्य धर्य निर्माण झाले .मातेच्या या गुणांचा संस्कार शिवाजीमहाराजांच्या जडणघडणीत पक्का रुजला होता. अशी हि माता छत्रपती शिवाजीमहाराजांच्या रुपाने अखंड भारत वर्षाला एक अनमोल राष्ट्रपुरुष देऊन गेली

संदर्भ -

१) शककर्ते शिवराय (विजय देशमुख)

२) शिवछत्रपती -एक मागोवा ( डॉ .जयसिंगराव पवार)