Wednesday, 10 May 2017

पोर्तुगीज आणि मराठे संबंध भाग १

                          पोर्तुगीज आणि मराठे

शिवपूर्व काळात 1497 साली पोर्तुगीज खलाशी वास्को दि गामा हा भारतात आला  त्यानंतर  20 मार्च 1602 साली डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली डचानी भारताच्या मलबार किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी वखारी स्थापन केल्या
डच पोर्तुगीज व्यापार भारतात सुरु झाला त्यांनतर  काही कळताच इंग्लंडच्या इंग्रजांनी भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना  करून1614 साली सुरत मध्ये नवीन वखाऱ्या चालू केल्या आणि पश्चिम किनाऱ्यावर आपली पकड बसवली
अश्या रीतीने
1)डच
2)पोर्तुगीज
3)इंग्रज
4)फ्रेंच
या चार युरोपीय राष्ट्रांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी कंपन्या स्थापन केल्या व ऐतदेशीय सत्ताधीशांच्या भांडणात भाग घेऊ लागली
शहाजी महाराजांच्या पासून शाहू महाराजांच्या  पर्यंत पोर्तुगीज व मराठ्यांचा आलेला संबध याची थोडक्यात माहिती इथे देत आहे.

_________________________________________

पोर्तुगीज आणि मराठे संबंध आला तो शहाजी महाराज निजामशाहीत सरदार होते तेव्हा पुढे शहाजी महाराज आदिलशाही मध्ये गेल्यावर  हा संबंध दृढ झाला .पोर्तुगीज व्हॉइस रॉय दों ब्राज द कॉस्रो व अँतोनियु मेलु द कॉस्रो या दोघांचा हि शाहजी महाराजांशी पत्र व्यवहार झाला
परंतु पोर्तुगीज आणि मराठे संबंद या मध्ये ऐतिहासीक महत्व प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून
1658 साली शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात स्वारी केली त्या वेळी पहील्यानंदा महाराजांचा आणि पोर्तुगीजनाचा संबध आला त्यामध्ये महाराजांच्या कडून पोर्तुगीजांच्या चौल व दमण या ठाण्यांना उपसर्ग पोहचला.
महाराजांच्या पहिल्या स्वारीचा उल्लेख
 फ्रॅन्सिकु मेलु द कॉस्रो  याने १६ऑगस्ट 1659 व दिनांक  रोजी पोर्तुगालच्या राजास लिहलेल्या पत्रात आढळतो तो म्हणतो "शिवाजी महाराजांनी जो आदिलशाही कोकणातील मूलखावर जी स्वारी केली त्याला औरंगजेबाची अंतस्थ फूस होती शिवाजी महाराज आदिलशाही प्रदेश काबीज करत विजापूर पर्यंत पोहचले आहेत त्यात त्याने(शिवाजी महाराजांनी)  आदिलशाही चे पायदळ व घोडदल नष्ट केले आहे आदिलशहाने  त्याचा प्रतिकार करण्यासाठी सैन्य गोळा केले आहे पण त्याला त्यात कितपत यश मिळेल याची शंका आहे."
या घटना घडेस्तोवर गोवाच्या  व्हॉइसरॉयची भूमिका गप्प राहण्याची होती परंतु शिवाजी महाराजनच्या वाढत्या सामर्थ्य कडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून गोवाच्या  व्हॉइसरॉयची  एप्रिल १६६३  मध्ये शिवाजी महाराजांना पत्र पाठवून कळविले कि  "तुमच्याशी मैत्रीचे संबध जुळण्यासाठी आमची इच्छा असल्याने  या वाटाघाटी करण्यासाठी " दो अल्वारो द आताईद" याला तुमच्याकडे पाठवत आहे."
(दो अल्वारो द आताईद हा महाराजांना येऊन भेटला पण या तहाची कलमे उपलब्ध नाहीत
कुडाळ मोहीम
महाराजांनी कुडाळ मोहीम काढली ती 9 सप्टेंबर  1667 मध्ये या कालावधी मध्ये आदिलशाही आणि मोघल आगाड्यावर जरी शांतता नादात असली तरीही कुडाळ कडील देसाई याना फूस लावून पोर्तुगीज हे  स्वराज्याला त्रास देऊ लागले होते कारण स्वराज्याची हद्द हि पोर्तुगीज प्रदेशाला जोडली गेली होती
याच वेळी हा पोर्तुगीज  व्हॉईसराय कोंदि द सॅव्हीसेंती हा अतिशय धर्मांध होता त्याने गोव्यातील हिंदूंचा छळ मांडला होता त्याने 1667 मध्ये गोवा व बरदेश मध्ये एकही हिंदू राहून घ्याचा नाही असा निर्धार केला होता.
त्याचबरोबर महाराजांच्या भीतीने  गोव्यात पळून गेलेले लखम सावंत ,केशव नाईक ,केशव प्रभू इत्यादी कोकणातील देसाई हे स्वराज्यावर घाडी घालत असत त्यांना पोर्तुगीजांची फूस असे
या सर्व गोष्टी चा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी कुडाळ मोहीम आखली व तयारीस लागले
महाराज 5000 पायदळ व 1000 घोडदळ घेऊन गोव्याच्या रोख निघाले बरदेश प्रदेशात महाराजांनी हल्ला केला याच भागात कोळवाळ  मध्ये  सावंत  आणि केशव नाईक देसाई राहत होता .
१०,११,१२ १६६७ नोव्हेंबर मध्ये  महाराजांनी हा भाग पुरता घुसळून काढला .महाराजांची या बारदेशात चांगलीच दहशद बसली .महाराजांचा मुक्काम डिचोली येथे असताना पोर्तुगीजांनी महाराजांच्या सोबत तहाचा बोलणे करण्यासाठी रामोजी शेणवी हा वकील पाठवून महाराज व व्हॉईस राय  यांनी ताहाची कलमे ठरवून २५ नोव्हेंबर 1667 ला तहवरती सही झाली
या तहामध्ये सावंत , देसाई यांनी महाराजांच्या मुलखाला त्रास देऊ नये दिल्यास पोर्तुगीज त्यांना गोव्यातून हाकलून देतील तसेच पोर्तुगीजांनी पण त्रास देऊ नये व  महाराजांनी कैद केली पोर्तुगीज लोक व जहाजे  सोडून द्यावी अशी तहाची कलमे होती.
(महाराजांनी सुरत शहरावर हल्ला केला तेव्हा त्यांचे सैन्य पोर्तुगीज प्रदेशातून गेले असा उल्लॆख पण काही ठिकाणी पोर्तुगीजांनी केला आहे)
गोव्याचा व्हॉईस राय हा महाराजांची तुलना अलेक्झांडर आणि सिजर याच्याशी करतोय म्हणजे मोघल व हिंदुस्तानातील  इतर सत्ताधारी यांच्या पेक्षा महाराजांच्या लष्करी प्रतिभेने तो स्थिमित होऊन गेला होता यात शंका नाही
इंग्रजांनीही महाराजांची तुलना अलेक्झांडर आणि सिजर याच्याशी केली आहे पण ती व्हॉईसरायच्या तुलनेत नंतर 10 वर्षांनी.

क्रमश .....

संदर्भ -
         मराठयांच्या इतिहासाची साधने (पोर्तुगीज दफ़्तर खंड २)
         शककर्ते शिवराय   - (विजय देशमुख)
          छत्रपतींचे आरमार /   (गजानन मेहंदळे )

No comments:

Post a Comment