स्वराज्याच्या प्रयत्नांना जशी गती मिळू लागली तशी स्वतःच्या शरीररक्षणाच्या दृष्टीने विशेष प्रकारचे सैन्यदल ठेवण्याची आवश्यकता शिवाजी महाराजांना भासू लागली या विशेष सैन्याचा उपयोग दोन प्रकारचा होता
एक तर स्वराज्याच्या मूळ असणाऱ्या राजाचे संरक्षण आणि विपत्ती आणि आणि बाणीच्या काळात राखीव सैन्य म्हणून
स्वराज्यच्या प्रदेशाची तपासणी करताना सैन्य आणि दुर्ग याचे निरीक्षण महाराज चांगलेच करत असत यातूनच निवडक लोक निवडून सेना तयार केल्या
रामचंद्रपंत अमात्य म्हणतात कि..
" राजे लोकांही निदान युद्धव्यतिरिक्त स्वशरीररक्षणाविषयी सर्वकाळ अत्यंत स्वाधीन असले पाहिजे पाकलय ,जलस्थान ,फलस्थान, वसनागर आदी करून जे नाजूक महाल याविराहित आणखी कारखाने यावर लोक ठेवणे ते परम विश्वासू प्रामाणिक जे असतील ते परीक्षा करून ठेवावे ,ते लोक घरी धान्याचे आज्ञावेगळे न जात आणि अंतस्थ प्रसंग बाहेर न बोल्त तसेच धानाचे सणीध उर्मीने बाहेर अन्याय करू न पावत"
असेच छत्रपतींच्या सैन्याचे विभाग कसे पाडण्यात आले त्याची रचना व संख्या या संबधी सभासद बखरी मध्ये पण उल्लेख आहे तो असा कि
"पुढे राजियानी आपली पालखी बरोबर चाखोट माणूस पाहून निवडक अस्मिता ठेवले चहू पातशहाचे आपण दावेदार एखादे प्रसंग पडतो तेव्हा जवळ आहेत ते कार्यास येतील असावं मावळे लोकात पाहनि करून निवडक माणूस पाहून पातके केली त्याचे नावे
१) शंभर लोक म्हणून नाव ठेवलें
२) साठ लोक म्हणून नाव ठेविले
३) चाळीस लोक म्हणून नाव ठेविले
४) तीस लोक म्हणून नाव ठेविले
5) वीस लोक म्हणून नाव ठेविले
या प्रमाणे पतकाची नावे ठेवली मावळ्या मध्ये लोक उत्तम निवडला
निवडक भरती करून दोन हजार माणूस ठेविले त्यात काही विटेकरी ,वरकड आड़ हत्यारी फिरंगी असे माणूस सजले"
महाराजांनी सोबतीला जे निवडक मावळे ठेवली होते त्याची उदाहरणे पण काही चरित्रामध्ये आढळत
सुरत स्वारी
महाराजांच्या सुरतेवरच्या स्वारीमध्ये इनायतखानच्या कडून आलेला एक हशम महाराजांच्या तंबूत शिरून त्यांच्यावरती वार करण्यासाठी हात वर उचलला पण मारेकऱ्यांचा हात वरच्या वर तोडून त्याचे तुकडे करण्यात या दलातील सैनिकांनी आपली कर्तव्यनिष्ठा व सावधानता प्रकट केली .
दक्षिणदिग्विजय मोहीम
अजून एक उदाहरण डच रेकॉर्ड मध्ये आहे ते असे कि या 1676 मध्ये महाराज ऑगस्ट महिन्यात गोवळकोंड्यास सूलतांनाची भेट झाली त्यावेळी उपस्थतीथ असणाऱ्या एका डच प्रवाशाने लिहले आहे कि
"शिवाजी व सुलतान बोल्त असताना थोड्याच वेळात ती सर्व जागा शिवाजी महाराजांच्या 6000घोडेस्वारांनी वेढून टाकली ते इतक्या हळूहळू कि एखाद्या माशीचा उडण्याचा सुद्धा आवाज ऐकू आला असता"
आग्रा भेट
आगऱ्या च्या भेटीच्या वेळी पण जे निवडक लोक महाराजांच्या सोबत होते त्यांची यादी
"राजियानी रघुनाथ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर ,बाजी जेधे ,निराजी रावजी सबनीस ,परमानंद आदी व्यक्तींना आपल्यासोबत निघण्याची आज्ञा केली या व्यतिरिक्त महाराजांनी 350 माणसाची निवड केली " यांच निवडक लोकांनी पुढे आपली कामे पालायांनाच्या वेळी चोक बजावली होती .
(राजगड ते आग्रा या प्रवासात 4000 मावळे होते परंतु महाराजांचे आग्रा च्या एक मजली वरती (शाही शिररस्त्या प्रमाणे मुलाखतीस येणाऱ्या म्हत्वच्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचे ठिकाण) असता त्यांचे स्वागत करण्यात आले तेव्हा तिथून पुढे महाराज निवडक सैन्य घेऊन (350मावळे) पुढे आग्रा मध्ये प्रवेश केला.
अफझलखान भेट
अफझल खानच्या भेटीच्या वेळीस महाराजांनच्या सोबत असणारे अंगरक्षक
संभाजी कावजी कोंढाळकर
जीवा महाल
सिद्दी इब्राहिम
काताजी इंगळे
कोंडाजी कंक
येसाजी कंक
विसाजी मुरंबक
संभाजी करकर
सरजी काटके
कृष्णाजी गायकवाड
हे दहा अफझल खानाच्या वधाचा वेळीस महाराजांच्या सोबत होते अंगरक्षक होते
शामियाना मध्ये झालेल्या चकमकीत सय्यद बडा याने महाराजांच्या वरती तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला पण जीवा महालेनि त्याला कापून आपल्या राजाचे रक्षण केले.
संदर्भ -
१)अफझलखान वध ( विनायक भावे)
२)शिवाजी व शिवकाल १६३०ते१७०७ ( डॉ. वि गो खोबरेकर)
३)क्षत्रियकुलावतंस शिवाजी महाराज यांचे चरित्र (कृष्णराव अर्जुन केळुसकर)
४) शककर्ते शिवराय (विजयराव देशमुख)
-ऋषिकेश चिंचकर