Sunday, 29 September 2019

जागर स्रीशक्तीचा - सावित्रीबाई फुले

महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय ‍इतिहासातले जोतीराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांम्पत्य होय.

१मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला (जोतीराव फुलेंची ची मावस बहीण सगुणा )मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही  पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली.१८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर तेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी समजून घेतले . पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्टा होती , म्हणून पतीनिधनानतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणारया कविमनाला जे काही आढलले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ही केले. १८५४ साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही १८९१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.महात्मा फुले यांच्या निधन (इ.स. १८९०) झाला. त्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.इ.स. १८९६ साली दुष्काळ पडला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
समजातल्या दिन : दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपदनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतध्नता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बलीकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
_______________________________
स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार करणारी एक छोटस काव्य
जाणीव-जागृतीचे काव्य : –

कोण कुठली। कळी फुलांची
जुनी विसर। नवीन पाही
रीत जगाची। उत्सृंखल ही
पाहुनिया मी । स्तिमित होई

__________________________________
______________________
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक साहित्य संमेलन भरते. याशिवाय, द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन या नावाचे पहिले राज्यस्तरीय संमेलनही नागपूर येथे २-३ जानेवारी २०१२ या तारखांना भरले होते.
________________________________
सावित्रीबाई फुले यांच्या नावाने काही संस्थांनी पुरस्कार ठेवले आहेत. ते असे :-
१)पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सामाजिक कार्यासाठीचा ’सावित्रीबाई फुले पुरस्कार’. हा पुरस्कार २०११-१२ सालापासून दरवर्षी, महिला-बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यास एका समाजसेविकेस दिला जातो. ५००१ रुपये रोख,व सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
2)महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
३) चिंचवडगाव येथील महात्मा फुले मंडळाचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार
४)महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी(पुणे)तर्फे सावित्रीबाई तेजस कला राष्ट्रीय पुरस्कार
५) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ’आदर्श माता’ पुरस्कार
६)क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
७) सावित्रीबाई फुले महिलामंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना दिले जाणारे स्त्रीरत्न पुरस्कार : आदर्शमाता रत्न, उद्योग रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न, जिद्द रत्न, पत्रकारिता रत्न, प्रशासकीय रत्न, वीरपत्नी रत्न, शिक्षण रत्न, वगैरे.
८) मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार
९) क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार
१०) मध्य प्रदेश सरकारचा उत्तम शिक्षिकेसाठीचा एक लाख रुपयांचा वार्षिक        सावित्रीबाई पुरस्कार (२०१२ सालापासून)

Tuesday, 10 September 2019

#savefort

लोकांची जी किल्ल्यावर हॉटेल होणार आहे का नाही यावरती जी दिशाभूल केली जातेय त्याबद्दल काही लोकांच्या शंका

प्रश्न -किल्ले भाड्याने देणे  आणि त्यावरती हॉटेल बांधणे हि बातमी खरी आहे का? 
खाली पोस्ट आणि 2016 साली किल्ल्यावर हॉटेल बांधनार आहेत याबाबद्दल झालेला Jr  चा फोटो आणि पूर्ण jr ची लिंक देतोय
या बद्दल माहिती असणारी मालोजीराव जगदाळे याची पोस्ट ची लिंक देतोय खाली टाकतोय

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10219721357446514&id=1295319406

JR ची लिंक खाली

https://drive.google.com/file/d/1b87P1vs73YVqZlVbXWLhurauWwhkSvug/view?usp=drivesdk

या गडकिल्लयावर हॉटेल बांधण्या संबधी झालेली मीटिंग ची लिंक
मिळालेली मान्यता

https://drive.google.com/file/d/1K9zIF3ShQV_RWrYuzXB4ImTRVX3mRVBa/view?usp=drivesdk

प्रश्न-
आणि याला आता स्थगिती मिळाली आहे मग कशाला विरोध करायचा
उत्तर -
स्थगिती मिळणे आणि रद्द करणे यात फरक असतो विधानसभेच्या तोंडावर हा निर्णयाला स्थगिती मिळाली आहे पण रद्द नाही झाला
हे लोक पुढे कशाचा घाट घालतील आपण त्यासाठी  आपण तयार राहिले पाहिजे

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2925727427498487&id=100001837757600

प्रश्न- पुण्याजवळील जाधवगड याला 300 वर्षाचा इतिहास आहे मग तिथे 2007 साली हॉटेल बांधले मग आधीच्या सरकार पण मोघलाईचे होते?
उत्तर-  जाधवगड नाही तर ती गढी आहे
वैयक्तिक मालकीचा वाडा आणि गड यांतील फरक न समजणारे लोक जेव्हा जाधवगडीवर टिप्पणी करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची किव करावशी वाटत

प्रश्न हा राजकीय आहे पण बऱ्याच दोस्तानी विचारला म्हणून
अमोल कोल्हे नि गडावर शूटिंग केले होते रोमँटिक त्याच काय
उत्तर- मी त्या व्यतिरिक्त त्याच किल्ल्यावर 4 मराठी  आणि 1 हिंदी मूवी चे शूटिंग झालेले आहे अस सांगतो पण अमोल कोल्हे विरोधी पक्षात आहेत म्हणून त्यांनाच पुढे केले जातंय मी सारवा सारव करत नाही तर काही लोक आपली दिशा भूल कशी करत आहेत हे सांगतोय
मुळात असले प्रश्न विचारणाऱ्य लोकांना माजे सांगणे आहे कि तुम्ही किल्ल्यावर हॉटेल बांधायच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध नाही केला तरी चालेल इथे लढणारी भरपूर आहेत तुमचे पक्ष प्रेम असेच डांगी मध्ये घालून घ्या






Sunday, 17 March 2019

शिवप्रताप...

अफझल खानाला महाराजनच्या मोहिमेवर पाठवताना जोराची तयारी करण्यात आली होती या मध्ये खानसोबत 12 हजार घोडदळ ,10 हजार पायदळ अगणित हत्ती ,उंट,तोफा,दारुगोळा, याशिवाय आदिलशाहने विशेष अधिकार असलेले डौलही दिले होते(डौल म्हणजे त्यावरती बादशाही शिक्का मोर्तब झालेली कोरी कागद) तीन वर्ष मोहिम चालली तरी कुठल्या हि प्रकारचा तुटवडा पडणार नाही एवढी तयारी करून आदिलशहा ने खानाला महाराजांचा स्वारी वरती पाठवले...पण हा खान होता तरी कोण, यालाच का पाठवला असेल? हा काही जिवंत राक्षसा पेक्षा कमी नव्हता... खानाला स्वतःचा अभिमान वाटेल असेच त्याचे कर्तृत्व होते पर्वतासारखा धिप्पाड असणाऱ्या खानाला पण माहिती होते आपण उच्चकुळातील नाही पण त्याने ते त्याच्या कर्तृत्वाने भरून काढले...
--------------------------------------------
1637 -38 च्या दरम्यान  खानाला कर्नाटक मोहिमे वरती पाठवण्यात आले होते या काळात खानाने श्रीरंग,पट्टण, कर्ण, पुरम ,मधुर ,बेदनूर काची या ठिकाणच्या मंडलिकांच्या वरती विजय मिळवला होता.
-----–----------------------------------
सिलोनचा अधिपती या अफझल खानामुळे आदिलशहा ला घाबरत होता .
-----------------------------------------
खानाचा दरारा कर्नाटक प्रांतात फार होता सिद्दी अंबर एक हंबशी
रणदुल्ला खानाच्या मोहिमेत सामील न होता 3 हजार घोड्या निशी सिंधनुर च्या सरहद्दी मध्ये अडून बसला तेव्हा रणदुल्ला खानाने 3 हजार स्वराणीशी अफझल खानाला त्या हबशी वर धाडले ,.अफझल खान येत आहे हे ऐकूनच त्याने स्वतःला बेड्या घातल्या व पालखी मध्ये बनुन खानच्या समोर हजर झाला
आणि म्हणला "मला पादशाही आज्ञा शिरसावंद्य आहे"
-----------------------------------------
अफझल खांन जेवढा पराक्रमी तेवढाच कपटी
शिरे पट्टणचा राजा कस्तुरीरंग याला खानाने अभय देऊन आपल्या छावणीत भेटीला बोलवून ऐनवेळी विश्वासघात करून मारले
---------------------------------------------
खान किती उलट्या काळजाचा होता हे  अबे करे या एका फ्रेंच प्रवाशाने आपल्या  डायरी मध्ये नोंद केले आहे कि
' या अफझल खानाला जेव्हा महाराजांच्या विरोधात मोहिमेला पाठवनार होते तेव्हा त्याने एक अमानुष कृत्य केले कि ज्या मध्ये त्याने  त्याला आठ दिवस स्वतःला जणांन खाण्यात कोंडून घेतले व हा काळ त्या स्त्रियांना उपभोगण्यात चैनीत घालवला व शेवटच्या दिवशी त्याने त्या 63 स्त्रियांना विहिरीत ढकलून मारून टाकले
--------------------------------------------------------------
स्वतःच्या सुभ्याची प्रशासकीय व्यवस्था ठेवण्यात हि खान हा तत्पर होता
त्याने कसबे अफझलपुर( स्वतःच्या नावाने त्याने अफझलपुर नावाचे गाव वसवले होते ) तेथील एका
लिंगसेठी मोकादमास खानानेपाठवलेली पत्रे हि प करड्या आमलाचे परीचायक आहे तो लिहतो "जेथे आसचील तेथे जाऊन खोदून काढून जो आसिरा देऊन ठेवीन त्यास जानोबा समेत कापून काढून घानियात घालून  पिलोन हे तुम्ही एकीने व तहकीक जाणणे"( म्हणजे कामचुकार पणा केला तर घाण्यात घालून पिळून काढीन अशी धमकी त्याने त्या लिंगसेठी ला दिली होती)
रयत आमचे पोगोडे आहेत म्हणजे रयत आमची मित्र आहे असे खानाची धारना त्या पत्रातून साध्य होते
--------------------------------------------------------
विजापूर मध्ये अफझल खानाने कोरलेल्या शिलालेख मध्ये तो लिहतो कि
"कातीले मूत मरिदान व काफिरान | शिकांदए बुनियादे बुतान| असे संबोधतो
'मी काफिर व बंडखोरी कत्तल करणारा व मूर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे ' त्या शिवाय तो सांगतो कि
"दिन दार भूतशिकन "व दिन दार कुफ्रशिकनं" अशी विशेषणे तो स्वतःला लावतो म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्तीचा विध्वंसक
------------------------------------------------------
अफझल खानाचा फारशी भाषेतील शिक्का उपलबध आहे त्यामध्ये तो म्हणतो
! गर अजा कुनद शसपहार अअला फजल फुजला व फजल अफजल – अज हर मलकी बजाए तश्स्बह आवाज आयद की अफजल अफजल याचा अथा असा की “आकािाने उत्कृष्ट्ट व्यक्तींची उत्कृष्ट्टता आणण अफजलची उत्कृष्ट्टता यांची तुलना केली तर जप माळेच्या मण्यासारखा प्रत्येक देवदुताकडून आवाज येईल अफजल अफझल!! अफझल हाच सवाश्रेष्ट्ठ आहे”
-----------------------------------------------------------
हा एवढा कपटी, पराक्रमी, स्वतःचे कर्तृत्व दक्षिण कर्नाटक मध्ये पासरवणारा, धिप्पाड ,तेवढाच चालक एक प्रशासक असा हा  अफझल खान हा या सह्याद्रीतल्या सिंहाची शिकार करायला चाललं होता....हा एवढा पराक्रमी, चालाख, कर्तृत्वान खानाचे पण  आपल्या महाराजांच्या पुढे काही चालले नाही.. शेवट वाई वरून खानाला प्रतापगड च्या पायथ्याला आणला आणि तेथून तो मागार जाणार नाही याचा चोक बंदोबस्त करून
10 नोव्हेंबर 1659 ला अफझल खान नावाचा 32 दातांचा बोकड भवानी मातेला अर्पण करून पुणे दक्षिण भारत हालवून ठेवणारा प्रताप महाराजांनी केला ज्याचा पडसात हा पूर्ण भारतभर उमटला
#उदंड_राजकारण
#parfect_planing
संदर्भ- शककर्ते शिवराय
       - अफझल खान वध
       - पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज

Saturday, 17 November 2018

मराठांच्या इतिहासातील एक अज्ञात राणी - जानकीबाई राणीसाहेब

मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती घराण्यात किती राण्या होऊन गेल्या?किती कर्तबगार निघाल्या ?किती दुर्दवी व किती सुदैवी निघाल्या हा खर तर एक स्वतंत्र इतिहासाचा अभ्यास होऊ शकले परंतु येसूबाई सारख्या शहाण्या राणीने तब्बल तीस वर्ष शत्रूच्या कैदेत राहूनही आपल्या आयुष्याच्या शेवटचे पूर्व सुखात झाल्याचे भाग्य मिळाले तर ताराबाई सारख्या अत्यन्त कर्तबगार राणीला आपल्या आयुष्याच्या शेवटी हिंदवी स्वराज्याच्या सर्व सत्ता उपभोगण्याचे भाग्य मिळूनही आयुष्यच्या शेवटी सत्तास्पर्धेत पराभूत व्हावे लागले ह्या आहेत इतिहासातील काही प्रसिद्ध राण्या परंतु एक असेही नाव आहे कि ज्यांना इतिहासाने अज्ञावसात ठेवले त्याच्या विषयी एक दोन ओळी पेक्षा अधिक माहिती मिळत नाही अशाच एका राणीची हि माहिती
त्या राणीचे नाव आहे जानकीबाई ....
मराठ्यांचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची हि प्रथम पत्नी  शिवछत्रपतींच्या अनेक घडामोडींनी खच्चून भरलेल्या आयुष्यात शिवाजी महाराजांच्या  हातून पार पडलेले  शेवटचे कार्य  म्हणजे आपल्या धाकट्या पुत्राचा या जानकीबाईशी रायगडवर घडवून आणलेला विवाह समारंभ हा संभारभ झाला आणि अवघ्या तीन आठवड्यात महाराज निजधामास गेले.जानकीबाई चा उल्लेख मिळतो तो लग्नचा आणि त्यांच्या मृत्यू चा परंतु लग्नाचा उल्लॆख मिळतो तो सभासद बखरीमधून
सभासद म्हणतो कि
"धाकटा  पुत्र राजाराम यास वधु पाहता प्रतापराव पूर्वी सेनापती होते त्यांची कन्या नवरी नेमस्त केली आणि लग्न सिद्ध ते पावले व वधूचे नाव सौभाग्यवती जानकीबाई असे ठविले मोठा महोच्छाह केला दानधर्म अपार केले."
सेनापती प्रतापराव गुजर यांनी महाराजाने बोल मनाशी लावून बहलोलखानावर तुटून पडले आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी धारातीर्थी आत्मसमर्पण केले.
प्रतापरावांचे हिंदवी स्वराज्यावरील  ऋणातून मुक्त  होण्यासाठी महाराजांनी आपला धाकटा पुत्र राजाराम महाराज यांचा विवाह प्रतापराव गुजरांची कन्येशी रायगड वर लावून दिला .
बिचाऱ्या महाराजांना काय माहिती होते कि नियतीने या जनकीच्या भाळी काय लिहून ठेवले आहे !पौराणिक काळात जानकीस 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता परन्तु त्याच्या दुप्पट म्हणजे 28  वर्षाहून अधिक काल वानवासांच्या अग्नीदिव्यातून जावे लागेलं..!
दुसरा उल्लॆख येतो तो मल्हारराव चिटणीस बखरीमध्ये त्यामध्ये उल्लेख येतो तो जानकीबाई च्या मृत्यूचा "पूर्वी प्रतापराव गुजरांची सोयरिक झाली ती वारलियावरी संभाजी महाराजांच्या काळात राजरामांची  दोन  लग्ने झाली एक मोहिते यांची कन्या ताराबाई व कागलकर घाटके यांची कन्या राजसाबाईसाहेब ऐशी केली होती."
तथापि डॉ आप्पासाहेब पवार यांनी संपादित केलेल्या कागदपत्रात यादव घराण्याची जी अस्सल कागदपत्र आहेत त्यामध्ये मात्र जाणिकबाई यांचा  उल्लेख सापडतो
त्या कागडपत्रामुळे एक मराठ्यांच्या इतिहासातील एक अज्ञात घटना उगडकिस येते ती म्हणजे राजाराम महाराजांची हि राणी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मरण न पावता ती सन 1689 मध्ये रायगड ला जुल्फिरखान खान ने वेढा घातला तोपर्यंत जिवंत होती
राजाराम महाराजांनी रायगडचा वेढा  कडक होण्यापूर्वी वेढ्यामधून निसटून प्रतापगडावर निघावे आणि मागे शाहू महाराज ( संभाजी महाराजांचे पुत्र) यांनी येसूबाई यांच्यासोबत रायगडवर राहून रायगड झुंजत ठेवावा.
परंतु राजाराम महाराजांनी प्रतापगडावर आल्यावर आपल्या मर्जीतील सेवक  गिर्जोजी यादव याला एक आदेश केला त्यामध्ये रायगड वरती  असणाऱ्या  शाहू महाराज व जानकीबाई याना  आणण्यासाठी  परत रायगड वरती पाठिवले
( राजाराम महाराजांची तीन लग्ने झाली होती जानकीबाई राजसाबाई , ताराबाई या तीन राण्या होत्या परंतु रायगड सोडताना  राजाराम महाराजांनी ताराबाई व राजसाबाई यांना सोबत घेतले परंतु जानकीबाई याच रायगड वरती  ठेवले होते याचे   कारण मात्र इतिहास देऊ शकत नाही)
रायगड मोघलांच्या ताब्यात गेला त्यावेळी  रायगडावरील येसूबाई ,शाहूराजे ,सकवरबाई ( शिवाजी महाराजांची एकमेव त्या वेळी ह्यात असणारी राणी) संभाजी महाराजांचे दासी पुत्र मानसिंग व मदनसिंग यांची   नावे इतिहास साधनात येतात मग जानकीबाई नाव येत नाही ..???
परंतु  एका यादव काळातील कागदामध्ये एक उल्लेख सापडला त्यावरून जानकीबाई ह्या पुढे कित्येक वर्ष जिवंत होत्या एवढेच न्हवे तर मोघलांच्या कैदेत असणाऱ्या येसूबाई बरोबर यातना सोसत होत्या असे हा उल्लेख सिद्ध करतो.
सन १७१८ मध्ये पेशवा बालाजी विश्वनाथ हा जेव्हा दक्षिणेचा मोघल सुभेफर सय्यद हुसेन यांच्याशी  करार करून उत्तरेत निघाला तेव्हा शाहू महाराजांनी  आपल्या पेशव्याला दिल्लीतून मोहिमेतून कोणकोणत्या गोष्ट साध्य व्हायला पाहिजेत याची यादी दिली ती खालीलप्रमाणे

                                          श्री
                           यादी मतलब करून घेणे
स्वराज्य थोरले कैलासवासी स्वामींचे प्रमाणे रायगड वरकड गडकोटदेखील करून घेणे ठाणी  मागून घेणें
१ खटाव
२अकलूज
3 कासेगाव
4 सांगोल
5 मंगळवेढे   इत्यादी
चंदी प्रांताचे राज्य गडकोटदेखील करून घेणे मातोश्री (येसूबाई) व मदनसिंगदेखील कबिले व दुर्गाबाई व जानकीबाई व सेवक लोक मागून घेणे .

म्हणजे रायगड वर बंदिवासात पडलेल्या राजपरिवारामध्ये  जानकीबाई पण होत्या त्यामुळे शाहू महाराजांनी जानकीबाई व कुटुंब कबिला यांना  दिल्लीतून सोडवून आणण्याचे आदेश बाळाजी विश्वनाथ याना केले म्हणजे १६८९ नंतर पुढे १७१८/१९ पर्यँत जानकीबाई मोघलांच्या कैदेत राहिल्या
जानकीबाई हि खरोखर एक दुर्दैवी स्त्री ठरली रायगडच्या पाडावाने अनेक स्वप्न ढसळली शिवाय तीस वर्ष प्रदीर्घ कैद .असे दुर्दैव येसूबाईच्या पण नशिबी आले पण आयुष्याच्या शेवटी मात्र आपला पुत्र राजा बनल्याचे भाग्य तिला नशिबी आले .मोघली कैदेत असताना अनेक यातना भोगल्या पण आयुष्यच्या शेवटी  भाग्योदय पाहता आला पण राणी जानकीबाईचे काय???
मोघली आक्रमणाच्या रुपाने हिंदवी स्वराज्यावर कोसळल्या भयानक संकटाची एक मूक साक्षीदार म्हणून त्या  राहिली जेवढी दुर्दैवी  तेवढीच उपेक्षित इतकी कि बिचारी केव्हा कालाधिन झाली हे पण इतिहासाला ज्ञात नाही.....

Thursday, 8 February 2018

बसरूर स्वारी

राजापूर, विजयदुर्ग ,देवगड व मालांड च्या खाड्यामध्ये महाराजांनी नवीन 50 तारवे बांधून तयार ठेवली होतो महाराजांच्या या आरमारी तायरीमुळे पोर्तुगीज डच इंग्रज यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. महाराजांची धाड कुठे पडणार याकडे सर्वांचे लक्ष होते महाराजांचा रोख यावेळी होता बेदनूरकडे
बेदनूरराज्य शिवापप्पा नायकाच्या काळात प्रसार पावले (1645-60) आदिलशाही दुर्बलतेचा फायदा घेत त्याने आपले राज्य घाटावर आणि घाटाखाली समुद्र किनाऱ्यावर वाढवले
1660 ला शिवाप्पा नायकाचा मृत्यू झाला. आणि तिथे सत्ता संघर्ष सुरु झाला शिवाप्पा चा भाऊ वेंकटप्पा आणि मुलगा भद्राप्प या चुलत्या पुरण्यात संघर्ष चालू झाला याच काळामध्ये पोर्तुगीज आणि डच सत्ता संघर्ष पण पराकोटीला पोहचला होता याच गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी बसनूर च्या स्वारी केली
महाराज मालांडला आले व इथल्या खाडीत त्यांनी 85 छोटी व 3 मोठी गलबते स्वारीसाठी सिद्ध केली
महाराजांच्या या पहिल्या नोका रोहणाची तारीख होती 8 फेब्रुवारी 1665
याच वेळी योगायोग असा कि मुंबई बेटाचा ताबा पोर्तुगीजांनी इंग्रजांना दिला  याच निमित्ताने पोर्तुगीज हे मुंबई ला गेले त्याचमुळे महाराज कोणताही विघ्न न येत गोव्याजवळून पुढे सरकले आणि बसरूर ला उतरले
मालांड पासून बसरूर पर्यंत महाराजांना वेंगुर्ले ,गोवे, कारवार ,गोकर्ण, कुमाथे ,होणावर, भटकळ ,गांगुळी  हि बेटे लागतात यावरून महाराजांचा प्रवास हा नक्कीच 4 ते 5 दिवस घडला असेल
13 किंवा 14 फेब्रुवारी ला महाराज बसरूर ला पोहचले आणि छापा घालून ते पूर्ण एक दिवस लुटले. बसरूरच्या लुटीचा महाराजांना अगणित माल जड विहार कापड मौल्यवान जिन्नस सापडले. डचांच्या नोंदीनुसार महाराजांनी बसरूरच्या सात व्यापार्यांना कैद करून सोबत नेले हे व्यापारी महाराजांनी मागितलेली खंडणी न भरू शकल्याने कैदेत पडले
सभासद बखरीच्या उल्लेखा नुसार महाराजांना या स्वारीमध्ये 2 कोटी होन एवढा खजिना मिळाला
हि लूट जहाजावर लादून महाराज परतले ते गोकर्ण महाबळेश्वर ला महाराज तिथून 4000  पायदळा सोबत अकोल्यास गेले तिथून त्यांनी लुटीचा जहाजे पाठवून स्वता 4000 सैन्यासह  खुश्कीच्या मार्गाने कारवार ला निघाले 22 फेब्रुवारी ला महाराज कारवार ला पोहचले .महाराज कारवार ला पोहचले हि बातमी इंग्रजांना हेरांच्या कडून कळाली होती तरी इंग्रज एवढे धास्तावले होती कि त्यांनी आपला माल मस्कतच्या एका अरबी जहाजावर भरला आणि तिथून पुढे पळून जायच्या तयारीत राहिले.

Thursday, 5 October 2017

मराठे आणि पोर्तुगीज संबध भाग -2

पोर्तुगीज व मराठा यांच्यात  डिचोली येथे  तह झाला पण या तहापूर्वी पोर्तुगीज राजा हा "साता समुद्राचा राजा" म्हणून घेऊन त्याने अरबी समुद्रात संचार करणाऱ्या इतर देशाच्या नौकाना आपले दस्तक बाळगण्यास भाग पाडीत असे  हे दस्तक जे जहाज बालगीत नाहीत त्यांना दंड वसूल करत असत पोर्तुगीज्यांच्या या दंडासमोर मोघल आरमाराने पण मान तुकवली होती. मोघल जहाजे प्रमाणे आदिलशाही जहाजे पण पोर्तुगीजांचा दस्तक बाळगत होते पोर्तुगीजांच्याबर तह झाल्यानंतरर महाराजांनी दर्यासारंगला पोर्तुगीजांचे दस्तक  न बाळगण्याची आज्ञा केली व आपल्या सागरी हद्दीपाशी संचार करणाऱ्या परकीय जहाजांनी आपले दस्तक बाळगण्याची द्वाही फिरवली त्यामुळे पोर्तुगीज व महाराज संबध बिघडण्यास कारण झाले. आणि हाच संघर्ष हा महाराजांच्या मृत्यू पर्यंत टिकला
.पोर्तुगीज नाविकाने महाराजांचे दस्तक बाळगण्यास नकार दिल्याने महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज आरमरावर हल्ले केले.त्यामुळे पोर्तुगीज व्यापार डाबघाई ला आला.पोर्तुगीजाणा यापुढे नमते घ्यावे लागले.20 मार्च 1679 ला  पोर्तुगीजांनी एक पत्र पाठवल विनंती खातीर हे पत्र महाराजांना पाठवले होते त्यामध्ये  तो म्हणतो
" ओसळणे नदीतून  कर्नाटकात मीठ घेऊन जाणाऱ्या या राज्याच्या प्रजाजनाच्या नौकाना आपल्या आरमारी नौका अटकाव करीत आहेत त्या पैसे वसूल केल्याशिवाय सोडत नाहीत तरी संकेश्वर नदीत अटकेत ठेवलेल्या  जहाजाची आपण मुक्तता करावी आणि हि मुक्तता झाली कि  आमच्याशी कायमचा तह करण्यासाठी एक हुशार व वजनदार मनुष्य अधिकार देऊन आमच्याकडे पाठवावा"

पोर्तुगीज आणि मराठे संघर्षचं अजून एक कारण म्हणजे  "चौथाई"
महाराजांनी ठाणे हा जिल्हा आपल्या स्वराज्यात जोडला तेव्हा त्या जिल्ह्यातील चौथाई वसुलीवरून पोतुगीजांशी लढा चालू झाला.
महाराजनच्या अगोदर या भागात रामनगर या नावाचे राज्य होते त्या राज्याचा राजा पोतुगीज  वसाहतीतील अंतरंगत स्वाऱ्याच्या रक्षणाच्या बदली पोर्तुगीजांच्या कडून चौथाई वसूल करत असे.पण।महाराजांनी  जेव्हा  रामनगर व कोळी राजाचा या दोघांचा प्रदेश  घेतला तेव्हा  पोर्तुगीजांना चौथाई मागण्यास प्रारंभ केला पण पोर्तुगीजांनी महाराजांची मागणी धुडकावून लावता येईना तेव्हा. पोर्तुगीजांनी काही काळ कर भरला पण त्यांनी आजचे मरण उद्या ढकलले व महाराजांना पत्र पाठवून सांगितले " रामनगर च्या राजाने आमच्या कडून  १६७५ च्या कराची उचल घेतली आहे त्या रामनगरच्या राजाचा सर्व मुलुख घ्या  म्हणजे  रामनगरच्या राजाला देत असलेला कर आम्ही तुम्हाला देतो"
पोर्तुगीजांनी असे करत काही काळ कर भरला काही काळ नाही भरला त्यामुले पुन्हा महाराजांनी फोंड्याचा किल्ला घेऊन पोर्तुगीजांना थक्क करून टाकले त्यामुळे ते आता गोव्यात शिरतील या भीतीने पोर्तुगीजांनी महाराजांना कर द्याला चालू केला. दमण मध्ये पोर्तुगुजनच्या कडून मराठे जो  ग्राम खांडीचा कर वसूल करत होते तो भरण्यास मात्र पोर्तुगीजांनी चुकारपणा कधी केला नाही.