Saturday, 17 November 2018

मराठांच्या इतिहासातील एक अज्ञात राणी - जानकीबाई राणीसाहेब

मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती घराण्यात किती राण्या होऊन गेल्या?किती कर्तबगार निघाल्या ?किती दुर्दवी व किती सुदैवी निघाल्या हा खर तर एक स्वतंत्र इतिहासाचा अभ्यास होऊ शकले परंतु येसूबाई सारख्या शहाण्या राणीने तब्बल तीस वर्ष शत्रूच्या कैदेत राहूनही आपल्या आयुष्याच्या शेवटचे पूर्व सुखात झाल्याचे भाग्य मिळाले तर ताराबाई सारख्या अत्यन्त कर्तबगार राणीला आपल्या आयुष्याच्या शेवटी हिंदवी स्वराज्याच्या सर्व सत्ता उपभोगण्याचे भाग्य मिळूनही आयुष्यच्या शेवटी सत्तास्पर्धेत पराभूत व्हावे लागले ह्या आहेत इतिहासातील काही प्रसिद्ध राण्या परंतु एक असेही नाव आहे कि ज्यांना इतिहासाने अज्ञावसात ठेवले त्याच्या विषयी एक दोन ओळी पेक्षा अधिक माहिती मिळत नाही अशाच एका राणीची हि माहिती
त्या राणीचे नाव आहे जानकीबाई ....
मराठ्यांचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची हि प्रथम पत्नी  शिवछत्रपतींच्या अनेक घडामोडींनी खच्चून भरलेल्या आयुष्यात शिवाजी महाराजांच्या  हातून पार पडलेले  शेवटचे कार्य  म्हणजे आपल्या धाकट्या पुत्राचा या जानकीबाईशी रायगडवर घडवून आणलेला विवाह समारंभ हा संभारभ झाला आणि अवघ्या तीन आठवड्यात महाराज निजधामास गेले.जानकीबाई चा उल्लेख मिळतो तो लग्नचा आणि त्यांच्या मृत्यू चा परंतु लग्नाचा उल्लॆख मिळतो तो सभासद बखरीमधून
सभासद म्हणतो कि
"धाकटा  पुत्र राजाराम यास वधु पाहता प्रतापराव पूर्वी सेनापती होते त्यांची कन्या नवरी नेमस्त केली आणि लग्न सिद्ध ते पावले व वधूचे नाव सौभाग्यवती जानकीबाई असे ठविले मोठा महोच्छाह केला दानधर्म अपार केले."
सेनापती प्रतापराव गुजर यांनी महाराजाने बोल मनाशी लावून बहलोलखानावर तुटून पडले आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी धारातीर्थी आत्मसमर्पण केले.
प्रतापरावांचे हिंदवी स्वराज्यावरील  ऋणातून मुक्त  होण्यासाठी महाराजांनी आपला धाकटा पुत्र राजाराम महाराज यांचा विवाह प्रतापराव गुजरांची कन्येशी रायगड वर लावून दिला .
बिचाऱ्या महाराजांना काय माहिती होते कि नियतीने या जनकीच्या भाळी काय लिहून ठेवले आहे !पौराणिक काळात जानकीस 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता परन्तु त्याच्या दुप्पट म्हणजे 28  वर्षाहून अधिक काल वानवासांच्या अग्नीदिव्यातून जावे लागेलं..!
दुसरा उल्लॆख येतो तो मल्हारराव चिटणीस बखरीमध्ये त्यामध्ये उल्लेख येतो तो जानकीबाई च्या मृत्यूचा "पूर्वी प्रतापराव गुजरांची सोयरिक झाली ती वारलियावरी संभाजी महाराजांच्या काळात राजरामांची  दोन  लग्ने झाली एक मोहिते यांची कन्या ताराबाई व कागलकर घाटके यांची कन्या राजसाबाईसाहेब ऐशी केली होती."
तथापि डॉ आप्पासाहेब पवार यांनी संपादित केलेल्या कागदपत्रात यादव घराण्याची जी अस्सल कागदपत्र आहेत त्यामध्ये मात्र जाणिकबाई यांचा  उल्लेख सापडतो
त्या कागडपत्रामुळे एक मराठ्यांच्या इतिहासातील एक अज्ञात घटना उगडकिस येते ती म्हणजे राजाराम महाराजांची हि राणी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मरण न पावता ती सन 1689 मध्ये रायगड ला जुल्फिरखान खान ने वेढा घातला तोपर्यंत जिवंत होती
राजाराम महाराजांनी रायगडचा वेढा  कडक होण्यापूर्वी वेढ्यामधून निसटून प्रतापगडावर निघावे आणि मागे शाहू महाराज ( संभाजी महाराजांचे पुत्र) यांनी येसूबाई यांच्यासोबत रायगडवर राहून रायगड झुंजत ठेवावा.
परंतु राजाराम महाराजांनी प्रतापगडावर आल्यावर आपल्या मर्जीतील सेवक  गिर्जोजी यादव याला एक आदेश केला त्यामध्ये रायगड वरती  असणाऱ्या  शाहू महाराज व जानकीबाई याना  आणण्यासाठी  परत रायगड वरती पाठिवले
( राजाराम महाराजांची तीन लग्ने झाली होती जानकीबाई राजसाबाई , ताराबाई या तीन राण्या होत्या परंतु रायगड सोडताना  राजाराम महाराजांनी ताराबाई व राजसाबाई यांना सोबत घेतले परंतु जानकीबाई याच रायगड वरती  ठेवले होते याचे   कारण मात्र इतिहास देऊ शकत नाही)
रायगड मोघलांच्या ताब्यात गेला त्यावेळी  रायगडावरील येसूबाई ,शाहूराजे ,सकवरबाई ( शिवाजी महाराजांची एकमेव त्या वेळी ह्यात असणारी राणी) संभाजी महाराजांचे दासी पुत्र मानसिंग व मदनसिंग यांची   नावे इतिहास साधनात येतात मग जानकीबाई नाव येत नाही ..???
परंतु  एका यादव काळातील कागदामध्ये एक उल्लेख सापडला त्यावरून जानकीबाई ह्या पुढे कित्येक वर्ष जिवंत होत्या एवढेच न्हवे तर मोघलांच्या कैदेत असणाऱ्या येसूबाई बरोबर यातना सोसत होत्या असे हा उल्लेख सिद्ध करतो.
सन १७१८ मध्ये पेशवा बालाजी विश्वनाथ हा जेव्हा दक्षिणेचा मोघल सुभेफर सय्यद हुसेन यांच्याशी  करार करून उत्तरेत निघाला तेव्हा शाहू महाराजांनी  आपल्या पेशव्याला दिल्लीतून मोहिमेतून कोणकोणत्या गोष्ट साध्य व्हायला पाहिजेत याची यादी दिली ती खालीलप्रमाणे

                                          श्री
                           यादी मतलब करून घेणे
स्वराज्य थोरले कैलासवासी स्वामींचे प्रमाणे रायगड वरकड गडकोटदेखील करून घेणे ठाणी  मागून घेणें
१ खटाव
२अकलूज
3 कासेगाव
4 सांगोल
5 मंगळवेढे   इत्यादी
चंदी प्रांताचे राज्य गडकोटदेखील करून घेणे मातोश्री (येसूबाई) व मदनसिंगदेखील कबिले व दुर्गाबाई व जानकीबाई व सेवक लोक मागून घेणे .

म्हणजे रायगड वर बंदिवासात पडलेल्या राजपरिवारामध्ये  जानकीबाई पण होत्या त्यामुळे शाहू महाराजांनी जानकीबाई व कुटुंब कबिला यांना  दिल्लीतून सोडवून आणण्याचे आदेश बाळाजी विश्वनाथ याना केले म्हणजे १६८९ नंतर पुढे १७१८/१९ पर्यँत जानकीबाई मोघलांच्या कैदेत राहिल्या
जानकीबाई हि खरोखर एक दुर्दैवी स्त्री ठरली रायगडच्या पाडावाने अनेक स्वप्न ढसळली शिवाय तीस वर्ष प्रदीर्घ कैद .असे दुर्दैव येसूबाईच्या पण नशिबी आले पण आयुष्याच्या शेवटी मात्र आपला पुत्र राजा बनल्याचे भाग्य तिला नशिबी आले .मोघली कैदेत असताना अनेक यातना भोगल्या पण आयुष्यच्या शेवटी  भाग्योदय पाहता आला पण राणी जानकीबाईचे काय???
मोघली आक्रमणाच्या रुपाने हिंदवी स्वराज्यावर कोसळल्या भयानक संकटाची एक मूक साक्षीदार म्हणून त्या  राहिली जेवढी दुर्दैवी  तेवढीच उपेक्षित इतकी कि बिचारी केव्हा कालाधिन झाली हे पण इतिहासाला ज्ञात नाही.....

Thursday, 8 February 2018

बसरूर स्वारी

राजापूर, विजयदुर्ग ,देवगड व मालांड च्या खाड्यामध्ये महाराजांनी नवीन 50 तारवे बांधून तयार ठेवली होतो महाराजांच्या या आरमारी तायरीमुळे पोर्तुगीज डच इंग्रज यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. महाराजांची धाड कुठे पडणार याकडे सर्वांचे लक्ष होते महाराजांचा रोख यावेळी होता बेदनूरकडे
बेदनूरराज्य शिवापप्पा नायकाच्या काळात प्रसार पावले (1645-60) आदिलशाही दुर्बलतेचा फायदा घेत त्याने आपले राज्य घाटावर आणि घाटाखाली समुद्र किनाऱ्यावर वाढवले
1660 ला शिवाप्पा नायकाचा मृत्यू झाला. आणि तिथे सत्ता संघर्ष सुरु झाला शिवाप्पा चा भाऊ वेंकटप्पा आणि मुलगा भद्राप्प या चुलत्या पुरण्यात संघर्ष चालू झाला याच काळामध्ये पोर्तुगीज आणि डच सत्ता संघर्ष पण पराकोटीला पोहचला होता याच गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी बसनूर च्या स्वारी केली
महाराज मालांडला आले व इथल्या खाडीत त्यांनी 85 छोटी व 3 मोठी गलबते स्वारीसाठी सिद्ध केली
महाराजांच्या या पहिल्या नोका रोहणाची तारीख होती 8 फेब्रुवारी 1665
याच वेळी योगायोग असा कि मुंबई बेटाचा ताबा पोर्तुगीजांनी इंग्रजांना दिला  याच निमित्ताने पोर्तुगीज हे मुंबई ला गेले त्याचमुळे महाराज कोणताही विघ्न न येत गोव्याजवळून पुढे सरकले आणि बसरूर ला उतरले
मालांड पासून बसरूर पर्यंत महाराजांना वेंगुर्ले ,गोवे, कारवार ,गोकर्ण, कुमाथे ,होणावर, भटकळ ,गांगुळी  हि बेटे लागतात यावरून महाराजांचा प्रवास हा नक्कीच 4 ते 5 दिवस घडला असेल
13 किंवा 14 फेब्रुवारी ला महाराज बसरूर ला पोहचले आणि छापा घालून ते पूर्ण एक दिवस लुटले. बसरूरच्या लुटीचा महाराजांना अगणित माल जड विहार कापड मौल्यवान जिन्नस सापडले. डचांच्या नोंदीनुसार महाराजांनी बसरूरच्या सात व्यापार्यांना कैद करून सोबत नेले हे व्यापारी महाराजांनी मागितलेली खंडणी न भरू शकल्याने कैदेत पडले
सभासद बखरीच्या उल्लेखा नुसार महाराजांना या स्वारीमध्ये 2 कोटी होन एवढा खजिना मिळाला
हि लूट जहाजावर लादून महाराज परतले ते गोकर्ण महाबळेश्वर ला महाराज तिथून 4000  पायदळा सोबत अकोल्यास गेले तिथून त्यांनी लुटीचा जहाजे पाठवून स्वता 4000 सैन्यासह  खुश्कीच्या मार्गाने कारवार ला निघाले 22 फेब्रुवारी ला महाराज कारवार ला पोहचले .महाराज कारवार ला पोहचले हि बातमी इंग्रजांना हेरांच्या कडून कळाली होती तरी इंग्रज एवढे धास्तावले होती कि त्यांनी आपला माल मस्कतच्या एका अरबी जहाजावर भरला आणि तिथून पुढे पळून जायच्या तयारीत राहिले.

Thursday, 5 October 2017

मराठे आणि पोर्तुगीज संबध भाग -2

पोर्तुगीज व मराठा यांच्यात  डिचोली येथे  तह झाला पण या तहापूर्वी पोर्तुगीज राजा हा "साता समुद्राचा राजा" म्हणून घेऊन त्याने अरबी समुद्रात संचार करणाऱ्या इतर देशाच्या नौकाना आपले दस्तक बाळगण्यास भाग पाडीत असे  हे दस्तक जे जहाज बालगीत नाहीत त्यांना दंड वसूल करत असत पोर्तुगीज्यांच्या या दंडासमोर मोघल आरमाराने पण मान तुकवली होती. मोघल जहाजे प्रमाणे आदिलशाही जहाजे पण पोर्तुगीजांचा दस्तक बाळगत होते पोर्तुगीजांच्याबर तह झाल्यानंतरर महाराजांनी दर्यासारंगला पोर्तुगीजांचे दस्तक  न बाळगण्याची आज्ञा केली व आपल्या सागरी हद्दीपाशी संचार करणाऱ्या परकीय जहाजांनी आपले दस्तक बाळगण्याची द्वाही फिरवली त्यामुळे पोर्तुगीज व महाराज संबध बिघडण्यास कारण झाले. आणि हाच संघर्ष हा महाराजांच्या मृत्यू पर्यंत टिकला
.पोर्तुगीज नाविकाने महाराजांचे दस्तक बाळगण्यास नकार दिल्याने महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज आरमरावर हल्ले केले.त्यामुळे पोर्तुगीज व्यापार डाबघाई ला आला.पोर्तुगीजाणा यापुढे नमते घ्यावे लागले.20 मार्च 1679 ला  पोर्तुगीजांनी एक पत्र पाठवल विनंती खातीर हे पत्र महाराजांना पाठवले होते त्यामध्ये  तो म्हणतो
" ओसळणे नदीतून  कर्नाटकात मीठ घेऊन जाणाऱ्या या राज्याच्या प्रजाजनाच्या नौकाना आपल्या आरमारी नौका अटकाव करीत आहेत त्या पैसे वसूल केल्याशिवाय सोडत नाहीत तरी संकेश्वर नदीत अटकेत ठेवलेल्या  जहाजाची आपण मुक्तता करावी आणि हि मुक्तता झाली कि  आमच्याशी कायमचा तह करण्यासाठी एक हुशार व वजनदार मनुष्य अधिकार देऊन आमच्याकडे पाठवावा"

पोर्तुगीज आणि मराठे संघर्षचं अजून एक कारण म्हणजे  "चौथाई"
महाराजांनी ठाणे हा जिल्हा आपल्या स्वराज्यात जोडला तेव्हा त्या जिल्ह्यातील चौथाई वसुलीवरून पोतुगीजांशी लढा चालू झाला.
महाराजनच्या अगोदर या भागात रामनगर या नावाचे राज्य होते त्या राज्याचा राजा पोतुगीज  वसाहतीतील अंतरंगत स्वाऱ्याच्या रक्षणाच्या बदली पोर्तुगीजांच्या कडून चौथाई वसूल करत असे.पण।महाराजांनी  जेव्हा  रामनगर व कोळी राजाचा या दोघांचा प्रदेश  घेतला तेव्हा  पोर्तुगीजांना चौथाई मागण्यास प्रारंभ केला पण पोर्तुगीजांनी महाराजांची मागणी धुडकावून लावता येईना तेव्हा. पोर्तुगीजांनी काही काळ कर भरला पण त्यांनी आजचे मरण उद्या ढकलले व महाराजांना पत्र पाठवून सांगितले " रामनगर च्या राजाने आमच्या कडून  १६७५ च्या कराची उचल घेतली आहे त्या रामनगरच्या राजाचा सर्व मुलुख घ्या  म्हणजे  रामनगरच्या राजाला देत असलेला कर आम्ही तुम्हाला देतो"
पोर्तुगीजांनी असे करत काही काळ कर भरला काही काळ नाही भरला त्यामुले पुन्हा महाराजांनी फोंड्याचा किल्ला घेऊन पोर्तुगीजांना थक्क करून टाकले त्यामुळे ते आता गोव्यात शिरतील या भीतीने पोर्तुगीजांनी महाराजांना कर द्याला चालू केला. दमण मध्ये पोर्तुगुजनच्या कडून मराठे जो  ग्राम खांडीचा कर वसूल करत होते तो भरण्यास मात्र पोर्तुगीजांनी चुकारपणा कधी केला नाही.

Tuesday, 11 July 2017

शिरकाई देवी

रायगड किल्ला शिवरायांनी घेतला तेव्हा तो जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकड़े होता. पण त्याही पूर्वी हा किल्ला पानशेत धरणाच्या जलफुगवट्यात बुडालेल्या आताच्या शिर्कोली गावाशि संबंधित असलेल्या शिर्के घराण्यातील सरदारांच्या ताब्यात होता. त्यामुळे या शिर्के घराण्याने आपल्या गावची ग्रामदेवता /कुलदेवता म्हणून या शिर्काईचं मंदिर गडावर बांधून तिची गडावर स्थापना केली.
पुढे शिरक्यांच्या नंतर गड मोऱ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर झालेल्या झटापटीतहा किल्ला छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. मात्र इतकी स्थित्यंतरे होऊन सुद्धा गडावर असलेल्या या "शिर्काइ " देवीचं महत्व तसुभरही कमी झाले नाही. तिच्या पूजा-पाठ, होम-हवन, नवस-ओटी मधे केव्हाच खंड पडला नाही. शिवपूर्वकाळात, शिवकाळात आणि शिवोत्तरकाळातही या देवीची " गड़देवता "म्हणूनच पूजा अर्चा केली जात होती अन सद्याही केली जाते. पेशवे काळात या देवीसाठी झालेल्या खर्चाचे तपशील पेशवे दफ्तरात मिळतात.

Wednesday, 10 May 2017

Royal Bodyguard of Chatrapati Shivaji Maharaj


स्वराज्याच्या प्रयत्नांना जशी गती मिळू लागली तशी स्वतःच्या शरीररक्षणाच्या दृष्टीने विशेष प्रकारचे सैन्यदल ठेवण्याची आवश्यकता शिवाजी महाराजांना भासू लागली या विशेष सैन्याचा उपयोग दोन प्रकारचा होता
एक तर स्वराज्याच्या मूळ असणाऱ्या राजाचे संरक्षण आणि विपत्ती आणि आणि बाणीच्या काळात राखीव सैन्य म्हणून
स्वराज्यच्या प्रदेशाची तपासणी करताना सैन्य आणि दुर्ग याचे निरीक्षण महाराज चांगलेच करत असत यातूनच निवडक लोक निवडून सेना तयार केल्या
रामचंद्रपंत अमात्य म्हणतात कि..
" राजे लोकांही निदान युद्धव्यतिरिक्त स्वशरीररक्षणाविषयी सर्वकाळ अत्यंत स्वाधीन असले पाहिजे पाकलय ,जलस्थान ,फलस्थान, वसनागर आदी करून जे नाजूक महाल याविराहित आणखी कारखाने यावर लोक ठेवणे ते परम विश्वासू प्रामाणिक जे असतील ते परीक्षा करून ठेवावे ,ते लोक घरी धान्याचे आज्ञावेगळे न जात आणि अंतस्थ प्रसंग बाहेर न बोल्त तसेच धानाचे सणीध उर्मीने बाहेर अन्याय करू न पावत"
असेच छत्रपतींच्या सैन्याचे विभाग कसे  पाडण्यात आले त्याची रचना व संख्या या संबधी सभासद बखरी मध्ये पण उल्लेख आहे तो असा कि
"पुढे राजियानी आपली पालखी बरोबर चाखोट माणूस  पाहून निवडक अस्मिता ठेवले चहू पातशहाचे आपण दावेदार एखादे प्रसंग पडतो तेव्हा जवळ आहेत ते कार्यास येतील असावं मावळे लोकात पाहनि करून निवडक माणूस पाहून पातके केली  त्याचे नावे
१) शंभर लोक म्हणून नाव ठेवलें
२) साठ लोक म्हणून नाव ठेविले
३)  चाळीस लोक म्हणून नाव ठेविले
४) तीस लोक म्हणून नाव ठेविले
5) वीस  लोक म्हणून नाव ठेविले
या प्रमाणे पतकाची नावे ठेवली मावळ्या मध्ये लोक उत्तम निवडला
निवडक भरती करून दोन हजार माणूस ठेविले त्यात काही विटेकरी ,वरकड आड़ हत्यारी फिरंगी असे माणूस सजले"
महाराजांनी सोबतीला जे निवडक मावळे ठेवली होते त्याची उदाहरणे पण काही चरित्रामध्ये आढळत
                                     सुरत स्वारी
महाराजांच्या सुरतेवरच्या स्वारीमध्ये  इनायतखानच्या कडून आलेला एक हशम महाराजांच्या तंबूत शिरून त्यांच्यावरती  वार करण्यासाठी हात वर उचलला  पण मारेकऱ्यांचा हात वरच्या वर तोडून त्याचे तुकडे करण्यात या दलातील सैनिकांनी आपली कर्तव्यनिष्ठा व सावधानता प्रकट केली .
                                दक्षिणदिग्विजय मोहीम
अजून एक उदाहरण डच रेकॉर्ड मध्ये आहे ते असे कि या 1676 मध्ये महाराज  ऑगस्ट महिन्यात गोवळकोंड्यास सूलतांनाची भेट झाली त्यावेळी उपस्थतीथ असणाऱ्या एका डच प्रवाशाने लिहले आहे कि
"शिवाजी व सुलतान बोल्त असताना थोड्याच वेळात ती सर्व जागा शिवाजी महाराजांच्या 6000घोडेस्वारांनी  वेढून टाकली ते इतक्या हळूहळू कि एखाद्या माशीचा उडण्याचा सुद्धा आवाज ऐकू आला असता"
                                    आग्रा भेट
आगऱ्या च्या भेटीच्या वेळी पण जे निवडक लोक महाराजांच्या सोबत होते त्यांची यादी
"राजियानी रघुनाथ कोरडे, त्र्यंबक सोनदेव डबीर ,बाजी जेधे  ,निराजी रावजी  सबनीस ,परमानंद  आदी व्यक्तींना आपल्यासोबत निघण्याची आज्ञा केली या व्यतिरिक्त महाराजांनी 350 माणसाची निवड केली " यांच निवडक लोकांनी पुढे आपली कामे पालायांनाच्या वेळी चोक बजावली होती .
(राजगड ते आग्रा या प्रवासात 4000 मावळे होते परंतु महाराजांचे आग्रा च्या एक मजली वरती  (शाही शिररस्त्या प्रमाणे मुलाखतीस येणाऱ्या म्हत्वच्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचे ठिकाण) असता त्यांचे स्वागत करण्यात आले तेव्हा तिथून पुढे महाराज निवडक सैन्य घेऊन (350मावळे) पुढे  आग्रा मध्ये प्रवेश केला.
                             अफझलखान भेट
अफझल खानच्या भेटीच्या वेळीस महाराजांनच्या सोबत असणारे अंगरक्षक
संभाजी कावजी कोंढाळकर
जीवा महाल
सिद्दी इब्राहिम
काताजी इंगळे
कोंडाजी कंक
येसाजी कंक
विसाजी मुरंबक
संभाजी करकर
सरजी काटके
कृष्णाजी गायकवाड
हे दहा अफझल खानाच्या वधाचा वेळीस महाराजांच्या सोबत होते अंगरक्षक होते
शामियाना मध्ये झालेल्या चकमकीत सय्यद बडा याने महाराजांच्या वरती तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला पण जीवा महालेनि त्याला कापून आपल्या राजाचे रक्षण केले.

संदर्भ -
१)अफझलखान वध ( विनायक भावे)
२)शिवाजी व शिवकाल १६३०ते१७०७ ( डॉ. वि गो खोबरेकर)
३)क्षत्रियकुलावतंस शिवाजी महाराज यांचे चरित्र (कृष्णराव अर्जुन केळुसकर)
४) शककर्ते शिवराय (विजयराव देशमुख)

-ऋषिकेश चिंचकर

पोर्तुगीज आणि मराठे संबंध भाग १

                          पोर्तुगीज आणि मराठे

शिवपूर्व काळात 1497 साली पोर्तुगीज खलाशी वास्को दि गामा हा भारतात आला  त्यानंतर  20 मार्च 1602 साली डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली डचानी भारताच्या मलबार किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी वखारी स्थापन केल्या
डच पोर्तुगीज व्यापार भारतात सुरु झाला त्यांनतर  काही कळताच इंग्लंडच्या इंग्रजांनी भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना  करून1614 साली सुरत मध्ये नवीन वखाऱ्या चालू केल्या आणि पश्चिम किनाऱ्यावर आपली पकड बसवली
अश्या रीतीने
1)डच
2)पोर्तुगीज
3)इंग्रज
4)फ्रेंच
या चार युरोपीय राष्ट्रांनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी कंपन्या स्थापन केल्या व ऐतदेशीय सत्ताधीशांच्या भांडणात भाग घेऊ लागली
शहाजी महाराजांच्या पासून शाहू महाराजांच्या  पर्यंत पोर्तुगीज व मराठ्यांचा आलेला संबध याची थोडक्यात माहिती इथे देत आहे.

_________________________________________

पोर्तुगीज आणि मराठे संबंध आला तो शहाजी महाराज निजामशाहीत सरदार होते तेव्हा पुढे शहाजी महाराज आदिलशाही मध्ये गेल्यावर  हा संबंध दृढ झाला .पोर्तुगीज व्हॉइस रॉय दों ब्राज द कॉस्रो व अँतोनियु मेलु द कॉस्रो या दोघांचा हि शाहजी महाराजांशी पत्र व्यवहार झाला
परंतु पोर्तुगीज आणि मराठे संबंद या मध्ये ऐतिहासीक महत्व प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून
1658 साली शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात स्वारी केली त्या वेळी पहील्यानंदा महाराजांचा आणि पोर्तुगीजनाचा संबध आला त्यामध्ये महाराजांच्या कडून पोर्तुगीजांच्या चौल व दमण या ठाण्यांना उपसर्ग पोहचला.
महाराजांच्या पहिल्या स्वारीचा उल्लेख
 फ्रॅन्सिकु मेलु द कॉस्रो  याने १६ऑगस्ट 1659 व दिनांक  रोजी पोर्तुगालच्या राजास लिहलेल्या पत्रात आढळतो तो म्हणतो "शिवाजी महाराजांनी जो आदिलशाही कोकणातील मूलखावर जी स्वारी केली त्याला औरंगजेबाची अंतस्थ फूस होती शिवाजी महाराज आदिलशाही प्रदेश काबीज करत विजापूर पर्यंत पोहचले आहेत त्यात त्याने(शिवाजी महाराजांनी)  आदिलशाही चे पायदळ व घोडदल नष्ट केले आहे आदिलशहाने  त्याचा प्रतिकार करण्यासाठी सैन्य गोळा केले आहे पण त्याला त्यात कितपत यश मिळेल याची शंका आहे."
या घटना घडेस्तोवर गोवाच्या  व्हॉइसरॉयची भूमिका गप्प राहण्याची होती परंतु शिवाजी महाराजनच्या वाढत्या सामर्थ्य कडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून गोवाच्या  व्हॉइसरॉयची  एप्रिल १६६३  मध्ये शिवाजी महाराजांना पत्र पाठवून कळविले कि  "तुमच्याशी मैत्रीचे संबध जुळण्यासाठी आमची इच्छा असल्याने  या वाटाघाटी करण्यासाठी " दो अल्वारो द आताईद" याला तुमच्याकडे पाठवत आहे."
(दो अल्वारो द आताईद हा महाराजांना येऊन भेटला पण या तहाची कलमे उपलब्ध नाहीत
कुडाळ मोहीम
महाराजांनी कुडाळ मोहीम काढली ती 9 सप्टेंबर  1667 मध्ये या कालावधी मध्ये आदिलशाही आणि मोघल आगाड्यावर जरी शांतता नादात असली तरीही कुडाळ कडील देसाई याना फूस लावून पोर्तुगीज हे  स्वराज्याला त्रास देऊ लागले होते कारण स्वराज्याची हद्द हि पोर्तुगीज प्रदेशाला जोडली गेली होती
याच वेळी हा पोर्तुगीज  व्हॉईसराय कोंदि द सॅव्हीसेंती हा अतिशय धर्मांध होता त्याने गोव्यातील हिंदूंचा छळ मांडला होता त्याने 1667 मध्ये गोवा व बरदेश मध्ये एकही हिंदू राहून घ्याचा नाही असा निर्धार केला होता.
त्याचबरोबर महाराजांच्या भीतीने  गोव्यात पळून गेलेले लखम सावंत ,केशव नाईक ,केशव प्रभू इत्यादी कोकणातील देसाई हे स्वराज्यावर घाडी घालत असत त्यांना पोर्तुगीजांची फूस असे
या सर्व गोष्टी चा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी कुडाळ मोहीम आखली व तयारीस लागले
महाराज 5000 पायदळ व 1000 घोडदळ घेऊन गोव्याच्या रोख निघाले बरदेश प्रदेशात महाराजांनी हल्ला केला याच भागात कोळवाळ  मध्ये  सावंत  आणि केशव नाईक देसाई राहत होता .
१०,११,१२ १६६७ नोव्हेंबर मध्ये  महाराजांनी हा भाग पुरता घुसळून काढला .महाराजांची या बारदेशात चांगलीच दहशद बसली .महाराजांचा मुक्काम डिचोली येथे असताना पोर्तुगीजांनी महाराजांच्या सोबत तहाचा बोलणे करण्यासाठी रामोजी शेणवी हा वकील पाठवून महाराज व व्हॉईस राय  यांनी ताहाची कलमे ठरवून २५ नोव्हेंबर 1667 ला तहवरती सही झाली
या तहामध्ये सावंत , देसाई यांनी महाराजांच्या मुलखाला त्रास देऊ नये दिल्यास पोर्तुगीज त्यांना गोव्यातून हाकलून देतील तसेच पोर्तुगीजांनी पण त्रास देऊ नये व  महाराजांनी कैद केली पोर्तुगीज लोक व जहाजे  सोडून द्यावी अशी तहाची कलमे होती.
(महाराजांनी सुरत शहरावर हल्ला केला तेव्हा त्यांचे सैन्य पोर्तुगीज प्रदेशातून गेले असा उल्लॆख पण काही ठिकाणी पोर्तुगीजांनी केला आहे)
गोव्याचा व्हॉईस राय हा महाराजांची तुलना अलेक्झांडर आणि सिजर याच्याशी करतोय म्हणजे मोघल व हिंदुस्तानातील  इतर सत्ताधारी यांच्या पेक्षा महाराजांच्या लष्करी प्रतिभेने तो स्थिमित होऊन गेला होता यात शंका नाही
इंग्रजांनीही महाराजांची तुलना अलेक्झांडर आणि सिजर याच्याशी केली आहे पण ती व्हॉईसरायच्या तुलनेत नंतर 10 वर्षांनी.

क्रमश .....

संदर्भ -
         मराठयांच्या इतिहासाची साधने (पोर्तुगीज दफ़्तर खंड २)
         शककर्ते शिवराय   - (विजय देशमुख)
          छत्रपतींचे आरमार /   (गजानन मेहंदळे )

Friday, 13 January 2017

सर्जा

पोर्तुगीजांच्या अहवालातील शहा आलमच्या स्वारी चा वृत्तांत असा आहे कि "15 जानेवारी 1684 रोजी संभाजीच्या राज्यातील बिचोली येथे 40,000 स्वार ,60,000 हजार पायदळ 1900 हत्ती आणि 20,000 उंट असे मोठे मोघली सैन्य येऊन उतरले हे सैन्य मोघलांच्या मुलगा शहाआलम याच्या अधिपत्या खाली होते तसेच 18 जानेवारीला मोगलांचे फार सामर्थ्यवान आरमार हि बंदरात येऊन पोहचले असे मोगलांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध मोठ्या फौजा विभाग करून पाठवल्या होत्या"
आता संभाजी महाराजांनी या भल्या मोठ्या फौजानां कसे उत्तरेत दिले याचे वृत्तात सुद्धा एक मोघली इतिहासकार करतो कि...
1684 च्या सुरवातीस बूसातीन-इ-सलातीनकार लिहतो कि "संभाजी विरुद्ध शहा आलम बरोबर गेलेल्या फौजेच्या वाटा आणि रसद जाण्याचे सर्व मार्ग शत्रूंनी(संभाजी महाराज) बंद केले.त्यामुळे फौजाना खाण्यापिण्याचे सामान मिळणे बंद झाले संभाजीने चालवलेले छापे यामुळे विजापूर कडून मदत होणे हि बंद झाले. बहुत कठीण प्रसंग प्राप्त झाला जनावरे उपाशी मरू लागली
फौजेच्या लोकांनाही या संकटांचा सामना करावा लागला तेव्हा त्या फौजेस परत येण्यास दुःख झाले." उपाशी फौजा माघार फिरल्या...
अरे ज्या राजाची राजनीती ,युद्धनीती चा अभ्यास जगभर केला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आखाड्यात तयार झालेले युवराज आपल्या वडीलचे डावपेच खेळण्यात थोडीही कसर सोडणार नाही हे वास्तविक सत्य आहे आणि ते मान्य करावेच लागेल.
संदर्भ- मराठ्यांच्या इतिहासाची साधने (पोर्तुगीज दप्तर )
          औरंगजेब- जदुनाथ सरकार