Tuesday, 11 July 2017

शिरकाई देवी

रायगड किल्ला शिवरायांनी घेतला तेव्हा तो जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकड़े होता. पण त्याही पूर्वी हा किल्ला पानशेत धरणाच्या जलफुगवट्यात बुडालेल्या आताच्या शिर्कोली गावाशि संबंधित असलेल्या शिर्के घराण्यातील सरदारांच्या ताब्यात होता. त्यामुळे या शिर्के घराण्याने आपल्या गावची ग्रामदेवता /कुलदेवता म्हणून या शिर्काईचं मंदिर गडावर बांधून तिची गडावर स्थापना केली.
पुढे शिरक्यांच्या नंतर गड मोऱ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर झालेल्या झटापटीतहा किल्ला छ.शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. मात्र इतकी स्थित्यंतरे होऊन सुद्धा गडावर असलेल्या या "शिर्काइ " देवीचं महत्व तसुभरही कमी झाले नाही. तिच्या पूजा-पाठ, होम-हवन, नवस-ओटी मधे केव्हाच खंड पडला नाही. शिवपूर्वकाळात, शिवकाळात आणि शिवोत्तरकाळातही या देवीची " गड़देवता "म्हणूनच पूजा अर्चा केली जात होती अन सद्याही केली जाते. पेशवे काळात या देवीसाठी झालेल्या खर्चाचे तपशील पेशवे दफ्तरात मिळतात.