Friday, 13 January 2017

सर्जा

पोर्तुगीजांच्या अहवालातील शहा आलमच्या स्वारी चा वृत्तांत असा आहे कि "15 जानेवारी 1684 रोजी संभाजीच्या राज्यातील बिचोली येथे 40,000 स्वार ,60,000 हजार पायदळ 1900 हत्ती आणि 20,000 उंट असे मोठे मोघली सैन्य येऊन उतरले हे सैन्य मोघलांच्या मुलगा शहाआलम याच्या अधिपत्या खाली होते तसेच 18 जानेवारीला मोगलांचे फार सामर्थ्यवान आरमार हि बंदरात येऊन पोहचले असे मोगलांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध मोठ्या फौजा विभाग करून पाठवल्या होत्या"
आता संभाजी महाराजांनी या भल्या मोठ्या फौजानां कसे उत्तरेत दिले याचे वृत्तात सुद्धा एक मोघली इतिहासकार करतो कि...
1684 च्या सुरवातीस बूसातीन-इ-सलातीनकार लिहतो कि "संभाजी विरुद्ध शहा आलम बरोबर गेलेल्या फौजेच्या वाटा आणि रसद जाण्याचे सर्व मार्ग शत्रूंनी(संभाजी महाराज) बंद केले.त्यामुळे फौजाना खाण्यापिण्याचे सामान मिळणे बंद झाले संभाजीने चालवलेले छापे यामुळे विजापूर कडून मदत होणे हि बंद झाले. बहुत कठीण प्रसंग प्राप्त झाला जनावरे उपाशी मरू लागली
फौजेच्या लोकांनाही या संकटांचा सामना करावा लागला तेव्हा त्या फौजेस परत येण्यास दुःख झाले." उपाशी फौजा माघार फिरल्या...
अरे ज्या राजाची राजनीती ,युद्धनीती चा अभ्यास जगभर केला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आखाड्यात तयार झालेले युवराज आपल्या वडीलचे डावपेच खेळण्यात थोडीही कसर सोडणार नाही हे वास्तविक सत्य आहे आणि ते मान्य करावेच लागेल.
संदर्भ- मराठ्यांच्या इतिहासाची साधने (पोर्तुगीज दप्तर )
          औरंगजेब- जदुनाथ सरकार